Hingoli : युट्युबवर पाहिले अनेकवेळा व्हिडीओ; नंतर उचललं टोकाचं पाऊल; हिंगोलीतील धक्कादायक घटना

जीवन संपवताना जास्त यातना होणार नाही म्हणून या तरुणाने युट्युबवर व्हिडीओ पाहिले आणि नंतर गळफास घेतल्याचं उघडं झालं.
Hingoli Crime News
Hingoli Crime News Saam TV
Published On

Hingoli News : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील डोंगरकडा गावात अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपली जीनयात्रा संपवली होती. पोलीस (Police) या प्रकरणाचा तपास करत असताना एक धक्कादायक माहिती उघडकीस आली. जीवन संपवताना जास्त यातना होणार नाही म्हणून या तरुणाने युट्युबवर व्हिडीओ पाहिले आणि नंतर गळफास घेतल्याचं उघडं झालं. (Hingoli News Today)

Hingoli Crime News
Buldhana : भरधाव कार कठड्यावर आदळली; ६ वर्षीय चिमुकल्यासह वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरकडा येथील प्रशांत दिगंबर मोरे हा युवक डोंगरकडा येथेच इयत्ता अकरावी वर्गात शिक्षण घेत होता. उच्च शिक्षण घेण्यासाठी त्याने नांदेडला क्लासेसही लावले होते. मात्र मागील काही दिवसांपासून तो अस्वस्थ होता.

21 सप्टेंबर रोजी सकाळी सकाळी 11 वाजेपासून तो बेपत्ता झाला होता. याबाबत आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात नोंदही घेण्यात आली होती. पोलिस व त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे त्याने घर सोडण्यापूर्वी मोबाईल घरीच ठेवल्यामुळे त्याला शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.

Hingoli Crime News
Latur : लातुरात सशस्त्र दरोडा; पिस्तुलाचा धाक दाखवून ३ कोटींची लूट

दरम्यान, डोंगरकडा येथील उपबाजारपेठेच्या टिनपत्राच्या खोलीत साफसफाई करण्यासाठी कर्मचारी गेले असता, त्या ठिकाणी प्रशांतचा मृतदेह आढळून आला होता. ही आत्महत्या आहे की घातपात? असा संशय पोलिसांना होता.

पोलिसांनी त्याच्या घरी असलेल्या मोबाईलची तपासणी केली असता युट्यूबवर आत्महत्या कशी करावी, कोणत्या प्रकारे आत्महत्या केल्याने कमी त्रास होतो, दोन दिवस मृतदेह सापडू नये यासाठी ठिकाण कसे निवडावे याची माहिती घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरच त्याने गळफास घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com