Buldhana Chikhali News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Police : कर्नाटकातील चित्रपट निर्मात्यासह सहकाऱ्यांना धमकावत घेतले पैसे; चिखलीच्या पाच वाहतूक पोलिसांवर गुन्हे दाखल

Buldhana Chikhali News : कर्नाटकातील वाहन असल्याच्या कारणातून पोलिसांनी दोन ठिकाणी वाहनांची अडवणूक करत संबंधितांना धमकावले तसेच पैसे देखील उकलण्यात आल्याचा प्रकार चिखली येथे समोर आला आहे

संजय जाधव

बुलढाणा : कर्नाटकातून आलेल्या वाहन चालकांला अडवत त्याला धमकावत जबरदस्तीने पैसे उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्याच्या चिखली येथे समोर आला आहे. या प्रकरणात पाच वाहतूक पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गंभीर प्रकारामुळे खाकी वर्दीतील पोलिसांचे गुन्हेगारी स्वरूप चव्हाट्यावर आले आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे हा प्रकार घडला आहे. यात कर्नाटकातील चल्लकेरे येथील ताज अ. रहमान (वय २३) अकिब अरमान रहेमतुल्ला, शेख इब्राहीम अब्दुल कादिर आणि जुबेर अहमद जाफर या सहकाऱ्यांसह कारने मलकापूरकडे एका चित्रपट शूटिंगसाठी लोकेशन पाहण्यासाठी येत होते. मात्र चिखली- बुलढाणा मार्गावर त्यांची कार दोन वाहतूक पोलिसांनी अडविली. वाहनाची कागदपत्रे मागवून कारवाई टाळण्यासाठी ३ हजार रुपयांची मागणी या पोलिसांकडून करण्यात आली होती. 

दोन ठिकाणी केली अडवणूक 

तडजोड अंती जवळच असलेल्या चहा विक्रेत्याकडे १५०० रुपये ऑनलाईन दिल्यानंतर गाडी सोडण्यात आली होती. तर काही अंतरावर गेले असताना ताज रहमान यांना आणखी तीन पोलिसांनी पाठलाग करत वाहन अडवले. वाहनात ठेवलेल्या एअर रायफलच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांनी तब्बल २ लाख रुपयांची मागणी केली. याठिकाणी देखील तडजोडीअंती ५० हजार रुपये देण्याचे ठरले. 

पाच पोलिसांवर गुन्हा दाखल 

ताज रहमान यांना संशय आल्यामुळे त्यांनी वाहनासह घटनास्थळावरून निघून जाण्याचा प्रयत्न केला असता  त्यावेळी वाहनात बसलेल्या दोन पोलिसांनी पैसे नको, पण आम्हाला उतरवा असे सांगितले. ताज यांनी वाहन थांबवून त्यांना खाली उतरवले. या प्रकरणी चिखली पोलिसांत तक्रार दिली असून पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये अभय टेकाळे, गजानन भंडारी, विठ्ठल काळुसे, विजय आंधळे, संदीप किरके यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

Mumbai Metro7A: ट्रॉफिकचं नो टेन्शन; दहिसर ते एअरपोर्ट फक्त ५० मिनिटात पोहोचा, जाणून घ्या Metro 7चा मार्ग, तिकीट दर अन् थांबे

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Shocking : मुंबईचा तरुण लातुरात आला, लाईव्ह येऊन सगळं सांगितलं; नंतर अचानक आयुष्य संपवलं

Sunday Horoscope : संडे ४ राशींसाठी ठरणार धोक्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT