Pune Corporation : मनसेच्या राड्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांचे कामबंद; मनसेला पाठिंबा देत मविआचे आंदोलन

Pune News : पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्यातील जोरदार राड्यानंतर वातावरण तापले असून यात महाविकास आघाडीने देखील उडी घेतली आहे.
Pune Corporation
Pune CorporationSaam tv
Published On

पुणे : पुणे महापालिकेचे आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेले मनसेचे पदाधिकारी आणि आयुक्त यांच्या वाद झाला. दरम्यान मनसेने राडा केल्यानंतर आयुक्तांना पाठिंबा देण्यासाठी महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन पुकारले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने यामध्ये उडी घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठींबा दर्शवत आंदोलन छेडण्यात आले आहे. यामुळे पीसीएमसी मधील वातावरण तापलेले आहे. 

पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातील वस्तूंची चोरी झाल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र यावेळी आयुक्तांच्या दालनात मिटिंग चालू असताना मनसेचे पदाधिकारी थेट दालनात घुसले होते. यावरून आयुक्त आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. यावरून वातावरण तापले असून मनसे आणि महापालिका आयुक्त यांच्यातील राड्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरु केले आहे. 

Pune Corporation
Crime News : अंबाजोगाईत चोरट्यांचा हैदोस; एका रात्रीत चार दुकाने फोडली, किराणा दुकानातून लांबवीले तेलाचे डबे

कामबंद ठेवत कर्मचाऱ्यांचे कामबंद 

महापालिकेत आज कर्मचाऱ्याने आयुक्ताच्या पाठिंबा देण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे. तर आयुक्तांनी दिलेल्या वागणुकीला विरोध करण्यासाठी आणि मनमानी विरोधात महाविकास आघाडी मनसेसाठी मैदानात उतरली आहे. पुण्यात मनसे कार्यकर्त्यांना आयुक्ताने दिलेल्या वागणुकी विरोधात महाविकास आघाडी मनसेच्या नेत्याच्या पाठिंबासाठी आणि आयुक्तांच्या मनमानी कारभार दुपारी आंदोलन करणार आहे. 

Pune Corporation
Nashik Civil Hospital : नाशिक जिल्हा रुग्णालयात मोठा घोटाळा; बनावट कंपनी दाखवून कोट्यवधींची फसवणूक

दुपारी माविआचे निषेध आंदोलन 
महाविकास आघाडी मधील काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज मनसेच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या वागणुकीच्या निषेधार्थ महापालिकेसमोर आंदोलन करणार आहेत. दुपारी दोन वाजता महापालिकेच्या समोर महाविकास आघाडी आयुक्तांच्या मनमानी कारभार आणि काल झालेल्या आयुक्त आणि मनसे नेत्यांमधील वादा नंतर मनसेच्या पाठिंबासाठी आंदोलन करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com