Buldhana Accident News Saam TV
महाराष्ट्र

Buldhana Accident: भरधाव दुचाकी एका कारला धडकून दुसऱ्या कारवर आदळली; विचित्र अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू

Buldhana Accident News: बुलढाणा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाण्यातील खामगाव-मेहकर मार्गावर एक भयानक अपघात झाला.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana Accident News: बुलढाणा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाण्यातील खामगाव-मेहकर मार्गावर एक भयानक अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या एका कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर बाईक दुसऱ्या एका कारवर जाऊन आदळली.

धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतर दोन्ही कार एकमेकांवर आदळल्या. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन तरुण आणि कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

खामगाव-मेहकर मार्गावरील देऊळगाव सकर्शा गावाजवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तीन तरुण खामगाव-मेहकर महामार्गावरून दुचाकी घेऊन सुसाट वेगाने निघाले होते. त्याचवेळी समोर कार येत होती.

दुचाकीचा वेग जास्त असल्याने तरुणाचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि ते समोरील कारला धडकले. हा अपघात इतका भीषण होता की, कारची धडक बसताच दुचाकीसह तरुण बाजूला फेकले गेले आणि दुसऱ्या कारला जाऊन आदळले. त्याचवेळी दोन्ही कारचालकांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यांची सुद्धा जोरदार धडक झाली.

या विचित्र अपघातात दुचाकीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला याशिवाय तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून कारमधील व्यक्तींना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मृत तरुणांची नावे अद्याप कळू शकली नाही. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

Maharashtra Live News Update: राहुल गांधी यांची नाशिक न्यायालयातील पुढील सुनावणी पुढे ढकलली

Aanandi Joshi : तिचं क्लिव्हेज किती डिप... मराठी गायिकेला पुण्यातील डॉक्टरचा आक्षेपार्ह मेसेज; नाव अन् पत्ता शोधून...

Traffic Police : वाहतूक विभागाचा पोलिसांनांच शिस्तीचा धडा; नो पार्किंग मध्ये उभ्या पोलिसांच्या दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Nilesh Ghaywal Video : गुंड निलेश घायवळचा भाजपच्या राम शिंदेंसोबतचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT