ZP School Saam tv
महाराष्ट्र

ZP School : जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घर व पाणीकर माफ; भडगाव ग्रामपंचायतचा अनोखा निर्णय

Buldhana News : स्पर्धेच्या युगात शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आली आहे. शाळेत विद्यार्थी मिळणे देखील कठीण झाले असून जिल्हा परिषदेची शाळा कायम सुरु राहावी; यासाठी भडगाव ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे

संजय जाधव

बुलढाणा : स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळणे आता अवघड झाले आहे. खासगी शाळांमध्ये मिळणाऱ्या सुविधा यामुळे पालक वर्ग आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये टाकत आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी आणि शाळा वाचविण्यासाठी ग्रामपंचातीने पुढाकार घेतला आहे. यात जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी आणि पाणी कर माफ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. 

बुलढाणा तालुक्यातील भडगाव गावात १९३२ पासून जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळा सुरू आहे. वर्ग १ ते ७ वर्ग पर्यंत मराठी माध्यम सुरळीत सुरू होते. त्यातून अनेक विद्यार्थी घडले आहेत. मात्र आजच्या स्पर्धेच्या युगात शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आली आहे. शाळेत विद्यार्थी मिळणे देखील कठीण झाले असून जिल्हा परिषदेची शाळा कायम सुरु राहावी; यासाठी भडगाव ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे.

शाळेत केवळ २९ विद्यार्थी 

आज खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळा तसेच इंग्लिश मिडीयम शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यात परिषदेच्या शाळा मागे पडत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. अर्थात खासगी शाळांमध्ये असलेल्या सुविधा यामुळे पालक वर्ग पाल्याना जिल्हा परिषद शाळांऐवजी खासगी शाळेत टाकत असतो. यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या कमी होत आहे. अशाच प्रकारे भडगाव येथील शाळेत पहिली ते चौथी या वर्गात मिळून केवळ २९ विद्यार्थी संख्या आहे. 

तर ग्रामपंचायतीकडून कर माफ  
शाळा टिकविण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेतला आहे. यात आपल्या मुलामुलीना जर स्थानिक जिल्हा परिषद शाळेत प्रवेशीत केले, तर अश्या गावातील या वर्षीचा घर व पाणी कर माफ करण्यात येईल; असा अनोखा व स्तुत्य उपक्रम राबविण्यासाठी निर्णय स्थानिक ग्रामपंचायतने नुकताच घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाकडे विद्याध्थ्यांचा कल वाढणार असून ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचा ग्रामीण पालकांकडून स्वागत होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

नराधमाचे हैवानी कृत्य, अपहरण करून ६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, नाक,तोंड अन् प्रायव्हेट पार्टमधून...

Pune : “आम्ही इथले भाई” कोयत्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी जिरवली

Blouse Back Designs: ट्रेंडी आणि यूनिक बॅक ब्लाउज डिझाईनसाठी 'हे' पॅटर्न नक्की ट्राय करा

Hair Care Tips : महिलांनो भांगात कुंकू भरताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर होईल मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT