Buldhana News Ration Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: ८२ हजार शेतकऱ्यांचे स्वस्त धान्यही बंद, पैसेही मिळेनात; शेतकरी कुटुंब आर्थिक संकटात

८२ हजार शेतकऱ्यांचे स्वस्त धान्यही बंद, पैसेही मिळेनात; शेतकरी कुटुंब आर्थिक संकटात

संजय जाधव

बुलढाणा : राज्य शासनाच्यावतीने प्राधान्य गटातील शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यांपासून धान्याऐवजी पैसे (Buldhana) देण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी महिन्यात शासन आदेश आल्यानंतर सीस्टिम अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाही. दुसरीकडे जिल्ह्यातील ८२ हजार शेतकऱ्यांचे धान्य (Ration) शासनाने बंद केले. त्‍यांना पैसे देखील मिळत नाही; असे चित्र जिल्‍ह्यात आहे. (Tajya Batmya)

बुलढाणा जिल्ह्यातील केवळ २७ लोकांना आतापर्यंत अनुदान मिळाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे रेशन धान्यही बंद झाले आणि त्यांना पैसेही मिळत नसल्याची परिस्थिती आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाने स्वस्त धान्याऐवजी रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरू केली आहे. या प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिमाह प्रति सदस्य पाच किलो अन्नधान्य, दोन रुपये प्रति किलो गहू आणि तीन रुपये प्रति किलो तांदूळ या दराने देण्यात येत होते.

शेतकरी (Farmer) आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये जानेवारी २०२३ पासून ही योजना लागू करण्यात आली आहे. १४ जिल्ह्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्याचाही समावेश आहे. ही योजना लागू होऊन पाच महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी जिल्ह्यातील ८२ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना रोख रकमेचा लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे या शेतकऱ्यांचे स्वस्त धान्य रोख रक्कमही मिळत नसल्याने जानेवारी महिन्यापासूनच बंद करण्यात आलेल्या प्राधान्य गटातील ८२ हजारांपेक्षा जास्त शेतकरी कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT