Buldhana Accident Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Accident : मिनी ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; शिक्षकाचा जागीच मृत्यू

Buldhana News : रोजप्रमाणे खामगांववरुन दुचाकीने पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत जात होते. याच दरम्यान मिनी ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली

संजय जाधव

बुलढाणा : भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना खामगाव येथे घडली. तर अन्य एकजण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघातानंतर रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती. 

इरफान शाह लुकमान शाह (वय ४८) असे अपघातात (Accident) मृत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. या अपघातात एकजण जखमी झाला असून त्यावर खामगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृत इरफान शाह हे रफुद्दीन शहाबुद्दीन जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल येथे शिक्षक होते. इरफान शाह हे रोजप्रमाणे (Khamgaon) खामगांववरुन दुचाकीने पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत जात होते. याच दरम्यान मिनी ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

नातेवाईकांचा आक्रोश 

खामगाव- पिंपळगाव राजा या रस्त्यावर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अपघात झाला. अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिंकानी गर्दी केली होती. तर अपघाताची माहिती कुटुंबियांना मिळताच रुग्णालयात धाव घेतली. इरफान शाह यांचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT