Buldhana Crime News Saamtv
महाराष्ट्र

Buldhana Crime News: बापरे! एकाच रात्री तब्बल १० घरफोड्या; परिसरात उडाली खळबळ

चोरट्यांच्या हातात फक्त एकाच ठिकाणी रक्कम किंवा दाग दागिने लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, प्रतिनिधी...

Deulgaon Mahi Crime: बुलढाणा जिल्ह्यातून चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेहेकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे एकाच रात्री 10 घरे अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र या चोरीत काहीही हाती न लागल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. (Buldhana burglary News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मेहेकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे एकाच रात्री 10 घरी अज्ञात चोरट्यांनी फोडून पोबारा केला आहे. देऊळगाव माळी येथे (दि. २ जून) रात्री सुमारे दोन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद नऊ घरांची घरफोडी केली. मात्र चोरट्यांना खाली हातानेच परतावे लागले. (Buldhana News)

देऊळगाव माळी येथील रहिवासी गणेश गाभणे (पोलीस), हरी नारायण मगर, भगवान काशिनाथ मगर, यांच्या घरी मात्र एक लाखापर्यंत चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. स्वप्निल गाभणे, डॉ. दत्तात्रय सुरूशे, डॉ.बद्री मगर, उद्धव गिरे, दिनेश आप्रे, पांडुरंग संस्थानचे कार्यालय, अशा दहा ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली आहे. पण चोरट्यांच्या हातात फक्त एकाच ठिकाणी रक्कम किंवा दाग दागिने लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अलमदार अशोक मस्के, रामेश्वर रिंढे, जायभाये, हे सकाळी घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा करत आहेत.

परत काही सुगाव लागतो का ? यासाठी गावातील काही ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT