Shirdi News: साईभक्‍तांसाठी आनंदाची बातमी; द्वारकामाई मंदिर आता रात्रभर खुले राहाणार

साईभक्‍तांसाठी आनंदाची बातमी; द्वारकामाई मंदिर आता रात्रभर खुले राहाणार
Shirdi News
Shirdi NewsSaam tv

सचिन बनसोडे

शिर्डी (अहमदनगर) : लाखो साईभक्‍तांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील (Shirdi) द्वारकामाई मंदिर आता रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा ‌संस्थानने (Saibaba Sansthan) घेतला आहे. यामुळे साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Maharashtra News)

Shirdi News
Pritam Munde Statement: उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तहसीलदारांना चिरीमीरी द्यावी लागते; खासदार प्रीतम मुंडेंचे खळबळजनक वक्तव्य

साईबाबांनी (sai Baba) आपले संपूर्ण जिवन ज्या द्वारकामाई मश्चिदमध्ये घालवले. ते स्थान सर्वांचे श्रद्धास्थान असल्याने शिर्डीत आलेला प्रत्येक भाविक इथे दर्शनाला येत असतो. द्वारकामाईचे दर्शन झाल्‍यानंतर साईबाबांचे दर्शन घेतले जाते. परंतु, शिर्डीत आलेल्‍या भक्‍तांसाठी आतापर्यंत हे द्वारकामाई मंदिर रात्री दहा वाजेपर्यंतच दर्शनासाठी खुले राहत होते. यामुळे उशिराने आलेल्‍या भाविकांना याचे दर्शन घेता येत नव्‍हते.

Shirdi News
Radhakrishna Vikhe Patil News: भाजपात येण्यास इच्छुक असणारे अनेकजण संपर्कात; विखे पाटलांचा दावा

संस्‍थानने घेतला निर्णय

उशिराने आलेल्‍या भक्‍तांना अनेकदा द्वारकामाई मंदिरात दर्शनासाठी जात येत नव्‍हते. परंतु, साई संस्‍थानने चांगला निर्णय घेेत रात्रीही द्वारकामाई खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता रात्री उशीरा येणाऱ्या साईभक्तांना किमान द्वारकामाई मंदिराच्या सभामंडपातून दर्शन घेता येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com