सचिन बनसोडे
शिर्डी (अहमदनगर) : काँग्रेसचा नेता बाहेर देशात भारताची बदनामी करत आहे. रोजची पोपटपंची आणि बेताल विधानांना लोक कंटाळली आहेत. यामुळे भाजपात येण्यास इच्छुक असणारी बरीच मंडळी संपर्कात असल्याचा दावा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केला आहे. (Tajya Batmya)
अहमदनगर जिल्हा विभाजन यावर बोलताना विखे पाटील यांनी सांगितले, की राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या नावाने जिल्ह्याचे नामांतर ही मोठी घटना आहे. जनतेच्या मनातील अपेक्षा टप्प्याटप्प्याने पूर्ण करू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दिला.
गांधींनी देशाचा इतिहास वाचावा
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबत बोलताना ज्यांना खासदारांची चाळीशी गाठता आली नाही. त्यांच्याकडून अशाच वक्तव्यांची अपेक्षा आहे. परदेशात जाऊन देशाला अवमानित करणे हा राहुल गांधी यांचा धंदा आहे. राहुल गांधींनी देशाचा इतिहास वाचावा. भारत देशाचा पाया हिंदु धर्मावर आधारीत आहे. राहुल गांधी बौद्धिक दिवाळखोर असल्याचे सांगत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध यावेळी बोलताना विखे पाटील यांनी केला.
पंकजा मुंडेंचा नेहमीच सन्मान
पंकजा मुंडे या पक्षाच्या जेष्ठ नेत्या आहेत. स्व. गोपीनाथ मुंडेंचा प्रगल्भ वारसा त्या चालवताय. त्यांचे काही गैरसमज असतील तर मी त्यांच्याशी चर्चा करील. (BJP) भाजपात त्यांचा नेहमीच सन्मान राहिलाय आणि उद्याही राहील, असे मत विखे पाटलांनी मांडले.
तरी बिघाडीच होणार
तिसरी आघाडी हा विषय शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार आहे. अशा कितीही आघाड्या बांधण्याचा प्रयत्न झाला तरी त्यात बिघाडीच होणार. विरोधक तत्वाने नाही, तर मोदींच्या व्यक्तिद्वेषाने एकत्र येताहेत. मोदीं विरोधात कितीही मेळावे घेतले तरी त्याचा परिणाम होणार नाही. २०२४ ला विक्रमी मताधिक्याने भाजपा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.