Sambhajinagar News: शेताच्‍या वादावरून कुटुंबात राडा; ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, दोन गंभीर

शेताच्‍या वादावरून कुटुंबात राडा; ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, दोन गंभीर
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील नेवरगाव गावात शेतीच्‍या वादारतून दोन गटात तुफान वाद झाला. या (Sambhajinagar) वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी करण्यात आलेल्या हल्ल्यात लाठ्या, काठ्या आणि हॉकी स्टिकने (Crime News) मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये दोन गंभीर तर दोन किरकोळ जखमी झाले आहे. (Breaking Marathi News)

Sambhajinagar News
Ashadhi Wari 2023: संत मुक्ताई पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान

गंगापूर तालुक्‍यातील नेवरगाव गावात शेताच्या बांधावरुन आज दोन कुंटुबात वाद उद्‌भवला. या वादात कुटुंबातील सदस्‍यांनी एकमेकांवर लाठ्याकाठ्यांनी वार करायला सुरवात झाली. या वादाच्‍या दरम्‍यान मारहाण केल्यानंतर बांध फोडण्यासाठी ट्रॅक्टर लावला असता बांध फोडु नये; म्हणुन दोघे ट्रॅक्टरच्या समोर उभे राहिले. यावेळी दुसऱ्या कुटुंबाने ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.

Sambhajinagar News
Jalna News: महिला कुस्तीपट्टूंना पाठींबा; जालन्यात खेळाडू, क्रीडा शिक्षकांचे आंदोलन

दोन गंभीर जखमी

तुफान मारामारीत ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ९ आरोपींवर विविध कलमान्वये गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वादात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन किरकोळ जखमी आहेत. जखमींना संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com