buldhana Saam tv
महाराष्ट्र

buldhana : बुलढाणा हादरलं; पोलीस कर्मचाऱ्याला गळा आवळून संवपलं, बंद कारमध्ये आढळला मृतदेह

buldhana latest News : बुलढाण्यात हादरवणारी घटना घडली आहे. पोलीस कर्मचाऱ्याची गळा आवळून हत्या केली आहे.

Vishal Gangurde

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणाच्या देऊळगाव राजामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. देऊळगाव राजामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाली आहे. पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. कर्मचाऱ्याची हत्या नेमकी कशामळे झाली, याचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. कर्मचाऱ्याच्या हत्येमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातील देऊळगाव राजा ते सिंदखेड राजा मार्गावरील गिरोली खुर्द शिवारात ज्ञानेश्वर म्हस्के या पोलीस कर्मचाऱ्याचा त्याच्याच गाडीत गळा आवळून खून केल्याचे पोलिसांनी प्राथमिक दर्शनी केलेल्या तपासता सिद्ध झाले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट पथक, गुन्हे शाखेने जाऊन पंचनामा केला. त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

या प्रकरणी तीन संशयित ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडून ही हत्येचा काही उलगडा होऊ शकतो का, या दुष्टीने सुद्धा पोलिस तपास करत आहेत. म्हस्के यांचा मृतदेह त्याच्याच गाडीत आढळला आहे. गाडी लिंबाच्या झाडाला लावून दिली होती. अपघात झाल्याचे आरोपींनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मृत म्हस्के हे जालना पोलीस दलात कार्यरत होते. काल सायंकाळी घरी आलेले होते.

तरुणाची चाकून भोसकून हत्या

लग्नात नाचताना धक्का लागल्याच्या रागातून तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली. २१ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आलीये. तरुणाचा मृतदेह नदी पात्रात फेकल्याची माहिती समोर आलीये. शहापूरच्या काजगाव हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT