Buldana Crime News
Buldana Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Buldana Crime News : नाचण्यावरून वाद झाल्याने चाकूने वार करत तरुणाची निर्घृण हत्या; बुलढाण्यातील थरारक घटना

Ruchika Jadhav

संजय जाधव

बुलढाणा शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मिरवणुकीत नाचत असताना एका तरुणाची हत्या करण्यात आलीये. मिरवणुकीमध्येच या तरुणावर चाकूने वार करण्यात आले आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा शहर हादरलंय.

आशुतोष संजय पडघान (वय २४ वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांनी खूनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.

बुलढाणा शहरातून १४ एप्रिल रोजी भीम जयंती उत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीत नाचण्यावरून मृतक आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाल्याने आरोपींनी मृतक आशुतोषला ओढत नेत त्याच्यावर चाकूने वार केले.

वार झाल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत तो तेथेच पडून होता. नंतर रस्त्यावरील काही व्यक्तींनी त्याला रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. मृतकावर पोलिसांत अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे समोर आले आहे.

सदर घटनेत हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दखल केलाय . बुलढाण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. रागाच्याभरात व्यक्ती थेट एकमेकांच्या जिवावर उठल्याचे अनेक घटनांतून समोर आलंय.

नाशिकच्या मालेगाव शहरातील संगमेश्वर भागात देखील अशीच घटना उघडकीस आली आहे. जून्या वादातून रफिक शेख नावाच्या युवकाचा धारदार हत्याराने रात्री खून करण्यात आला.

खून करण्यात आलेला तरुण रस्त्याने पळत जात असतांना खाली कोसळा. या घटनेचा काही भाग हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.दरम्यान घटना घडल्याने अप्पर पोलीस अधिकांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambegaon Rain News | पुण्यातील आंबेगाव तालुक्यात जोरदार पाऊस

Amravati News: गर्दी कमी करा असं सांगितलं म्हणून डॉक्टरला मारहाण, तिघांना अटक, घटना CCTV मध्ये कैद

Shantigiri Maharaj News | या उमेदवाराने थेट मोदींची भेट नाकारली! कारण काय?

Pimpri Chinchwad Hording: घाटकोपरनंतर आता पिंपरीतही होर्डिंग कोसळलं

Latur Marriage Story | पोलिसांनी शोधलं आणि आईवडिलांसमोर लग्न लावलं! अजब-गजब प्रेमकहाणी

SCROLL FOR NEXT