

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी मैदानात उतरून खेळाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची अवस्था बिकट होती. 46 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून भारताने 116 रन्स केले होते. वॉशिंग्टन सुंदर 10 रन्सवर, तर ध्रुव जुरेल 7 रन्सवर नाबाद होते.
भारताचा स्कोअर पाहता तिसऱ्या दिवशी टीम 200 रन्सचा टप्पा गाठेल की नाही, याबाबत शंका होती. पण ध्रुव जुरेलने मैदानात उतरून दमदार फलंदाजी केली आणि भारताची लाज वाचवली.
भारताकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ध्रुव जुरेलने शानदार खेळी केली. त्याने 14 चौकारांच्या मदतीने 88 रन्स केले. जुरेल हा भारताच्या पहिल्या डावातील सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज ठरला. त्याने गुरनूर बरारसोबत नवव्या विकेटसाठी 123 चेंडूंमध्ये 64 रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली. या भागीदारीमुळे भारताला अडीचशे रन्सच्या जवळ पोहोचता आलं.
जुरेलच्या खेळीमुळे टीम इंडियाचा डाव 86.1 ओव्हर्समध्ये 246 रन्सवर संपला. पण न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील 356 रन्सच्या तुलनेत भारत अजूनही 110 रन्सने मागे राहिला.
दुसऱ्या दिवसापर्यंत भारतासाठी एकही विकेट घेऊ न शकलेल्या जसप्रीत बुमराहची प्रतीक्षा अखेर तिसऱ्या दिवशी संपली. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात त्याने कर्णधार टॉम लॅथमला बाद करत विकेट मिळवली. बुमराहला मागील विकेट वेलिंग्टनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात मिळाली होती. त्यानंतर तब्बल 292 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर त्याला विकेट मिळाली.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 46 ओव्हर्समध्ये 3 विकेट गमावून 133 धावा केल्या आहेत. रचिन रवींद्र 46 रन्सवर, तर डॅरिल मिचेल 5 रन्सवर नाबाद आहेत. न्यूझीलंडकडे आता एकूण 243 रन्सची आघाडी आहे.
तिसऱ्या दिवशी एकूण 86.1 ओव्हर्सचा खेळ झाला. या दिवशी 7 विकेटच्या मोबदल्यात 263 रन्स झाल्या. ध्रुव जुरेलच्या खेळीमुळे भारताला दिलासा मिळाला असला, तरी न्यूझीलंडने सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.