Buldhana Crime Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Crime : जुना वाद उफाळून आला; पिता- पुत्रावर जीवघेणा हल्ला, पित्याचा मृत्यू

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेलोडी या गावात सदरची घटना घडली आहे. फार पूर्वीपासून असलेला वाद पुन्हा उफाळून आला होता. ४ मार्चला रात्री दोघांमध्ये पुन्हा वाद झाला

संजय जाधव

बुलढाणा : गावातील दोन परिवारांमध्ये जुना वाद होता. हा वाद पुन्हा उफाळून आला. यातूनच पिता- पुत्रावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात पित्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी असून त्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदरची धक्कादायक घटना बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात घडली असून घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेलोडी या गावात सदरची घटना घडली आहे. गावातील दोन कुटुंबांचा वाद होता. फार पूर्वीपासून असलेला वाद पुन्हा उफाळून आला होता. ४ मार्चला रात्री दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून समोरच्यानं पिता- पुत्रावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. यात पित्याचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. 

जखमी मुलावर उपचार सुरु 

दरम्यान धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने मुलगा गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. यानंतर गावातील काही नागरिकांनी त्याला लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली आहे.  

नातेवाईक आक्रमक 

दरम्यान घटनेतील हल्लेखोर फरार झाले आहेत. मात्र जीवघेणा हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही; अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी घेत मृतदेह खामगाव ग्रामीण पोलीस स्थानकात आणला. यावेळी पोलीस आणि नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge Under 200: फक्त 199 रुपयांत 28 दिवसांची वैधता; Jio, Airtel, Vi चा जबरदस्त रिचार्ज प्लान

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT