Buldhana Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana Crime News: बुलडाणा हादरला! २ मुलांचं अपरहण, एकाचा खून तर दुसरा बेपत्ता; नातेवाईकाने असं का केलं?

Boy Killed After Kidnapping In Buldhana: अप्पर पोलिस महासंचालक जिल्ह्यात असताना देखील बुलडाण्यामध्ये दोन मुलांचे अपहरण करण्यात आले. यामधील एकाची हत्या करण्यात आली. या घटनांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली.

Priya More

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्यामध्ये (Buldhana) धक्कादायक घटना घडली आहे. दोन चिमुकल्याचे अपहरण करण्यात आल. यामधील एका मुलाची हत्या करण्यात आली. तर दुसरा अद्याप बेपत्ता आहे. पोलिसांकडून (Buldhana Police) या मुलाचा शोध सुरू आहे. या घटनेमुळ बुलडाणा जिल्हा हादरला आहे. गावात राहणाऱ्या नातेवाईकानेच या मुलाची हत्या केली. अप्पर पोलिस महासंचालक जिल्ह्यात असताना ही घटना घडली त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून तपास सुरू आहे.

बुलडाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत दोनच चिमुकल्यांचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एकाचा खून करून त्याला उकिरड्यात पुरण्यात आल्याचे उघडकिस आले. तर दुसरा १४ वर्षांचा मुलगा अजूनही बेपत्ता आहे. जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी गावातून दोन दिवसापूर्वी १० वर्षीय शेख अरहान शेख हारूनचे अपहरण झाले होते. यामध्ये तपासाअंती त्याची हत्या झाल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी युद्धपातळीवर चिमुकल्याचा शोध घेतला त्याच गावामध्ये राहणाऱ्या अरहानच्या नातेवाईकावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी शेख अन्सारला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने अपहरण करून अरहानचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने अरहानचा मृतदेह उकिरड्यात पुरला असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अरहानचा मृतदेह रात्रीच उकिरड्यातून काढून ताब्यात घेतला. आरोपी शेख अन्सार शेख नसीर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

ही घटना ताजी असतानाच शेगाव तालुक्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली. शेगाव तालुक्यातील नागझरी येथील १४ वर्षीय मुलगा मंगळवारपासून बेपत्ता झाला आहे. कृष्णा राजेश्वर कराळे असे मुलाचे नाव असून मंगळवारी सकाळी १० वाजता तो शाळेत गेला होता. शाळा संपल्यावर देखील बराच वेळ होऊन ही तो घरी आला नाही. यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला.

गावात, शाळा परिसरात खूप शोधूनही कृष्णा भेटला नाही. अजून कृष्णाचा काहीच पत्ता लागलेला नाही. तो शेगाव येथील एका विद्यालयात वर्ग आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे कुटुंबीय चिंतेत असून ठिकठिकाणी त्याचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Yoga Workout: फिट राहण्यासाठी रोज करा हे 4 योगा

दोरखंड बांधून उखाडला अख्खाच्या अख्ख्या लाखोंचा खजिना; चोरट्यांनी पळवलं SBIचं एटीएम, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या ३ ते ४ दिवसात मिळणार ३००० रुपये?

Shepu Batata Bhaji Recipe: शेपू बटाटा भाजी कशी बनवायची?

प्रचारादरम्यान भाजपचा पैशांचा पाऊस, शिंदे गटाच्या नेत्यांनी रांगेहाथ पकडले, निवडणूक आयोगाचे पथक घटनास्थळी दाखल|VIDEO

SCROLL FOR NEXT