ACB officials during the arrest of Assistant Conservator of Forests Ashwini Apet in a bribery trap case in Buldhana. saam tv
महाराष्ट्र

Forest Department Bribe Case: नोकरीत बढती पण पैशांची हाव काही सुटेना; अखेर लाचखोर सहायक वन संरक्षक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Ashwini Apet Bribe News : बुलढाणा येथील सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी आपेटला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधिकारी अश्विनी आपटे आणि आणि लिपिक अमोल मोरेला रंगेहात पकडण्यात आलंय.

Bharat Jadhav

  • लाचखोर अधिकारी म्हणून ओळख

  • कर्मचारी, अधिकाऱ्यांना लाच घेण्यास दबाव टाकत

  • १५ हजारांचा लाच घेताना सहायक वन संरक्षक अधिकारीला अटक

बुलढाण्यातील लाचखोर सहायक वन संरक्षक अधिकारी (ACF) अश्विनी आपेट अखेर एसीबी जाळ्यात अडकली. अवैध मार्गाने तोडलेल्या झाडांची वाहतूक करण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना सहायक वन संरक्षक अधिकारीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर तिच्यासोबत लिपिक अमोल मोरे यालादेखील लाचलुचपत विभागाने अटक केली.

अश्विनी आपेट ही २०१६ बॅचची रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहे. मागील वर्षीच तिला सहायक वन संरक्षक अधिकारी पदाची बढती मिळाली होती. परंतु अश्विनी आपेट हिच्याबद्दल पैशासंबंधी अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेल्या होत्या. पण वरिष्ठांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती.

आता अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत तिला लाच घेताना रंगेहात पकडलं. अश्विनी आपेट हिच्याबद्दल लाचलुचपत विभागाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचत तिला जाळ्यात पकडलं.

लाचखोर अधिकारी म्हणून ओळख

वनविभागाच्या हद्दीतील तोडलेल्या झाडांची वाहतूक करण्यासाठी अश्विनी आपेट हिने ३० हजारांची लाच मागितली होती. त्यातील अॅडव्हान्स म्हणून १५ हजार रुपये स्वीकारतानाच ही कारवाई करण्यात आली. अश्विनी आपेट बुलढाणा वनविभागात सहायक वन संरक्षक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. या विभागात ती लाचखोर अधिकारी म्हणून ओळखली जायची अशी माहिती सूत्रांनी दिली.

हाताखालच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना ती पैसे गोळा करण्यासाठी दबाव टाकायची अशी माहिती आहे. अश्विनी आपेट हिची सुरुवातीची पोस्टिंग बीड जिल्ह्यातील केज रेंजमध्ये झाली होती. त्यावेळीही तिने असे अनेक प्रकार केले होते अशी माहिती सुत्रांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips: अजूनही नीट मेकअप करता येत नाही? मग रोज मेकअपसारख्या ग्लोसाठी लावा 'या' तीन गोष्टी

मुंबई हादरली! पिस्तुल काढलं अन् स्वत:वर धाड धाड गोळ्या झाडल्या, कांदिवलीत ४५ वर्षीय व्यक्तीचा टोकाचा निर्णय

TATA Sierra चं सर्वात स्वस्त मॉडेल कोणतं आहे?

Maharashtra Live News Update:आमदार सुरेश धस यांच्यावरील टीकेचा निषेध; आष्टीत सोशल फोरमचा 'टोणगा मोर्चा'

Buldhana Accident: नांदुरा- बुऱ्हाणपूर मार्गावर भीषण अपघात,भरधाव वडाप टॅक्सी खड्ड्यात उलटली

SCROLL FOR NEXT