Akola : दुसऱ्याशी संबंध असल्याचा संशय; डोकं सटकलं, बॉयफ्रेंडनं केली समलिंगी पार्टनरची हत्या

Akola Gay Partner Murder News : अकोल्यात समलिंगी प्रेमात जोडप्याने विश्वसघातात मिळाला म्हणून टोकाचं पाऊल उचललं. प्रियकराने आपल्या पार्टनरला काठीने मारझोड करत त्याची हत्या केली. या घटनेचा पियूधील तपास पोलीस करत आहेत.
Akola : दुसऱ्याशी संबंध असल्याचा संशय; डोकं सटकलं, बॉयफ्रेंडनं केली समलिंगी पार्टनरची हत्या
Akola Gay Partner Murder NewsSaam Tv
Published On
Summary
  • अकोला संजय नगरमध्ये समलिंगी नात्यातील पार्टनरची हत्या

  • विश्वासघाताच्या संशयातून काठीने डोक्यावर–तोंडावर वार

  • अमोल दिगांबर पवार याचा मृत्यू; आरोपी नितेश पोलिसांच्या ताब्यात

  • पोलीस तपास प्रक्रिया सुरू

अक्षय गवळी, अकोला

महाराष्ट्र राज्यातील पश्चिम विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या ३ वर्षांपासून एका तरुणाचा ज्याच्यावर जीव जडला, तो तरुण दुसऱ्याच्याच प्रेमात धुंद असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर नाराज असलेल्या तरुणाने कालं रात्री भयंकर कृत्य केलं. अकोला शहरातल्या मोठी उमरी भागात राहणाऱ्या एक समलिंगी पुरुषांच्या जोडप्याचे मागील तीन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होतं. मात्र प्रेमात विश्वासघात मिळतं असल्याच्या संशयाने प्रियकराने समलिंगी पार्टनरला संपवलं. अमोल दिगांबर पवार असं मृत तरुणाचं नाव आहे तर नितेश अरुण जंजाळ असं मारेकरी तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर अकोल्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत अमोल पवार आणि नितेश जंजाळ हे दोघेही चांगले मित्र होते. ३ वर्षापासून सोबत राहायचे. मात्र, काही दिवसांत दोघांमध्ये सातत्यानं वाद व्हायचा. अमोल हा समलिंगी रिलेशनशिपमध्ये विश्वासघात करत असल्याच्या कारणावरून हा वाद व्हायचा, असे नागरिकांकडून सांगण्यात आलं.

Akola : दुसऱ्याशी संबंध असल्याचा संशय; डोकं सटकलं, बॉयफ्रेंडनं केली समलिंगी पार्टनरची हत्या
Winter Alert : नववर्षाच्या स्वागताला गुलाबी थंडी! पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा घसरणार, वाचा, आजच हवामान

दरम्यान, काल रात्रीही त्यांच्यात वाद झाल्याचे समजले आहे. रात्री उशिरा नितेशने अमोलसाठी बाहेरून जेवण आणलं होतं. इथेच पुन्हा त्यांच्यातील जुना वाद उफाळला. याच दरम्यान नितेशने त्याच्या डोक्यावर तोंडावर लाठीने वार करत कायमचं संपवले, असा अंदाज घटनास्थळी वर्तवला जात आहे. पोलिसांनी मारेकरी नितेश जंजाळ याला ताब्यात घेतलं असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

Akola : दुसऱ्याशी संबंध असल्याचा संशय; डोकं सटकलं, बॉयफ्रेंडनं केली समलिंगी पार्टनरची हत्या
Mumbai : न्यू इयरच्या पार्टीसाठी घरी बोलावलं, लग्नाला नकार दिल्याने वाद; गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला

नेमकं काय घडलं?

अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातल्या संजय नगर भागात नितेश आणि अमोल या समलिंगी पुरुषांचं जोडपं राहतं. आज सकाळी अचानक यातील नितेश जंजाळ हा घरातून पळ काढत बाहेर सुटला, अन जोर जोरानं ओरडू लागला. अमोल खाली पडला आणि मरण पावला. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. थोड्या वेळातच सिव्हिल लाईन पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा सुरू झाला. तपासात मृत अमोलच्या अंगावर मोठया जखमा दिसून आल्या. त्यामुळं अमोलची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानंतर परिसरातल्या नागरिकांसह नितेशची चौकशी पोलिसांकडून सुरु झाली. तपासादरम्यान, सोबतच राहणाऱ्या नितेश जंजाळ यानेचं अमोलची हत्या केल्याचं समोर आलं. लाठी-काठीने तोंडावर, डोक्यावर जबर मारहाण झाल्यामुळे अमोल याचा मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. शवविच्छेदन प्रक्रियेसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयाकडं रवाना करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com