Winter Alert : नववर्षाच्या स्वागताला गुलाबी थंडी! पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा घसरणार, वाचा, आजच हवामान

Maharashtra Weather Update : राज्यात वर्षाअखेरीस गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत पारा २ ते ३ अंशाने घसरणार. महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात चढउतार कायम राहणार असून थंडीचा आनंद घेत नागरिकांनी शेकोट्या पेटवल्या आहेत.
Winter Alert : नववर्षाच्या स्वागताला गुलाबी थंडी! पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा घसरणार, वाचा, आजच हवामान
Maharashtra Weather UpdateSaam Tv
Published On
Summary
  • राज्यात गुलाबी थंडीचे पुनरागमन, पारा 6–7°C पर्यंत घसरला

  • किमान व कमाल तापमानात चढ-उतार आजही कायम

  • नववर्षात 2–3°C ने तापमान घटून थंडी वाढण्याचा अंदाज

  • नागरिक शेकोटी, धुके व पर्यटनाचा आनंद घेत आहेत

राज्यात वर्षाअखेरीस गुलाबी थंडी पाहायला मिळते आहे. आज राज्यात सर्वत्र किमान तापमानात चढ उतार कायम राहणार आहे. तर उद्यापासून किमान तापमानाचा पारा घसरून थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कमाल तापमानात देखील चढ उतार कायम राहणार आहे. वाढत्या थंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या असून नागरिक थंडीचा मनमुराद आनंद घेत आहेत.

आज २०२५ मधला शेवटचा दिवस असून उद्या पासून इंग्रजी नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. कित्येक दिवसांपासून कमी झालेला गारठा नव्या वर्षाच्या स्वागताला पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. मंगळवारी परभणीत ६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळ्यात ६.६ अंश सेल्सिअस, निफाड येथे ६.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अहिल्यानगर, जेऊर, ‎गोंदिया, ‎नागपूर, ‎यवतमाळ येथे ९ अंश, तर ‎पुणे, ‎नाशिक, अमरावती, भंडारा आणि ‎गडचिरोली येथे १० अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.

Winter Alert : नववर्षाच्या स्वागताला गुलाबी थंडी! पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा घसरणार, वाचा, आजच हवामान
Shocking : संशयाचं भूत राहुलच्या डोक्यात शिरलं, गाढ झोपलेल्या बायको अन् मुलाची कुऱ्हाडीने हत्या, दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला

काल म्हणजेच मंगळवारी निफाड, धुळे, परभणी येथे गेली काही दिवस सातत्याने थंडीचा कडाका कायम असल्याचे दिसून आले आहे. उर्वरित राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. पहाटेच्या वेळी धुके आणि दव पडल्याचे चित्र कायम आहे. आज राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहणार असून थंडी टिकून राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे .

Winter Alert : नववर्षाच्या स्वागताला गुलाबी थंडी! पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा घसरणार, वाचा, आजच हवामान
Kalyan : कल्याण–डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेचा जल्लोष, ढोल ताशांच्या गजरात भरले उमेदवारीचे फॉर्म, युतीत जागा वाटपावरून तेरी भी चूप मेरी भी चूप

उद्यापासून किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वाढत्या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी पर्यटनस्थळी तुफान गर्दी केली आहे. तर दुसरीकडे वाढत्या थंडीमुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यात गुलाबी थंडी पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com