Chikhali Crime Saam tv
महाराष्ट्र

Chikhali Crime : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून १० लाखांची रोकड लंपास; चिखली शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

Buldhana News : एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम चोरी करण्याच्या प्रकारात वाढ झाली असून चिखलीत देखील भरवस्तीत असलेले एटीएम फोडण्याचा प्रकार उघडकीस आला असून यातून १० लाखांची रोकड लांबविली

संजय जाधव

बुलढाणा : मध्यरात्रीच्या सुमारास सुमसाम असलेल्या परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ पाहण्यास मिळत आहे. असाच प्रकार चिखली शहरात घडला असून भर वस्तीच्या परिसरात असलेल्या एटीएम मशीनवर चोरट्यानी दरोडा टाकला आहे. रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीनचा पत्रा कापून यातील सुमारे १० लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.  

कोणतीही सुरक्षा नसल्याने एटीएम मशिनवर चोरट्यांकडून लक्ष केले जात आहे. मशिनचा पत्रा कापून किंवा त्यातून रोकड लांबवत असतात. तर काही ठिकाणी थेट मशीन उचलून नेले जात असल्याचे प्रकार घडले आहेत. असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली शहरात घडला असून मशीनचा पत्रा कापून रोकड लांबविली आहे. पोलीस आता विविध माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत आहेत.

चोरटे दीड तास एटीएम मशीनमध्ये 

चिखली शहरातील राऊतवाडी परिसरातील भरवस्तीत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये घुसून चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील दहा लाख रुपयांची रोकड लांबवल्याची धक्कादायक घटना चिखली शहरात घडली आहे. चोरट्यांनी सुमारे दीड तास या एटीएम मध्ये धुमाकूळ घालत गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून रोकड लांबवली. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. अतिशय दाट वस्तीच्या असलेल्या राऊतवाडी परिसरात अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. 

विहरीवरील मोटारी चोरणारी टोळी जेरबंद
लातूर : लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणबुडी मोटारी चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून ग्रामीण भागात सिंचनासाठी ठेवलेल्या विहिरीतील पाणबुडी मोटारी चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्या अनुषंगाने लातूर पोलीसानी कारवाई करत एकूण 16 पाणबुडी मोटारीसह दोघांना ताब्यात घेत कारवाई केली. दोन्हीही आरोपी धाराशिव जिल्ह्यातील आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi : अनुदानित युरिया खताचा अवैध साठा; २ ट्रक खत जप्त, गोडाऊनला लावले सिल

Today Gold Rate : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याने उच्चांक गाठला; ३ आठवड्यांत ७००० रुपयांची वाढ, १ तोळ्याचा भाव काय?

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात भरधाव कारने महिला आणि शाळकरी मुलाला उडवले

ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसात मिळतो? असं स्टेटस करा चेक

Flight Emergency : आकाशात थरार, एअर इंडियाचं विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न? ९ जण पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT