Buldhana News: Saamtv
महाराष्ट्र

Buldhana News: 'मित्रासोबत पोहायला गेला, घरी परतलाच नाही', पूर्णा नदीपात्रात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू; कुटुंबियांवर शोककळा

Buldhana News: बुलढाण्याच्या बोराळा येथील विद्यार्थ्यांचा भास्तन येथील पूर्णा नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा| ता. ९ जून २०२४

बुलढाणा जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बुलढाण्याच्या बोराळा येथील विद्यार्थ्यांचा भास्तन येथील पूर्णा नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जामोद तालुक्यातील बोराळा येथील दोन जण आंघोळी करिता भेंडवळ पुढील भास्तन पुलानजीक असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेले होते. त्यामधील एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

बोराळा येथील शिवम सहदेव तायडे (वय 17 वर्ष) आणि त्याचा मित्र अभिजीत संतोष गायकी हे भास्तन येथील पूर्णा नदी पात्रात आंघोळीसाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने शिवम चा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती त्याच्या मित्राने गावकऱ्यांना दिली. ज्यानंतर गावातील काही नागरिक घटनास्थळी दाखल होऊन शिवमला पाण्याबाहेर काढले आणि त्याला जळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

परंतु डॉक्टरांनी तपासणी करुन मृत्यू झाल्याची माहिती दिली. जळगाव पोलीस स्टेशन मध्ये या घटनेचा मर्ग दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शिवमच्या अचानक मृत्यूने तायडे परिवार तसेच गावामध्ये शोककळा पसरली आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO PF Update: EPFO चा मोठा निर्णय! आता PF चे पैसे अवघ्या 3 दिवसांत खात्यात

Maharashtra News Live Update: पुण्यात मुसळधार पावसाचा कहर! कादवे आणि पाबे घाटात दरड, झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

Preity Zinta: डीपफेकमुळे प्रीती झिंटा पोहोचली हायकोर्टात; न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

घरी पोहोचण्यापूर्वीच काळाचा घाला! वाशिमच्या घाटात कारचा चक्काचूर, २ जणांचा जागीच अंत

भाजपला सत्तेचा माज आलाय, हा व्हायरस तुम्ही पसरू देताय; राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना रोखठोक पत्र

SCROLL FOR NEXT