Buldhana Breaking News: Saamtv
महाराष्ट्र

Buldhana Accident: घरात बहिणीचे लग्नकार्य, जेवणाचे साहित्य आणताना भीषण अपघातात दोन भावांचा मृत्यू; गावावर शोककळा!

Buldhana Breaking News: बहिणीच्या लग्नकार्यात लागणाऱ्या जेवणाच्या स्वयंपाकाचे साहित्य घेऊन हे दोन्ही तरुण दुचाकीवरुन निघाले होते. यावेळी घारोड गावानजीक एका अज्ञात वाहनाने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. २३ मे २०२४

बुलढाण्यामध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. घरात बहिणीच्या लग्नाची लगबग सुरू असतानाच साहित्य घेऊन येत जाणाऱ्या दोन तरुणांच्या बाईकला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गाडीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने लग्नघरात शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, घरात बहिणीच्या लग्नाची गडबड सुरू असतानाच भीषण अपघातात दोन भावंडाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घडना बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात घडली. बहिणीच्या लग्नकार्यात लागणाऱ्या जेवणाच्या स्वयंपाकाचे साहित्य घेऊन हे दोन्ही तरुण दुचाकीवरुन निघाले होते.

यावेळी घारोड गावानजीक एका अज्ञात वाहनाने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सम्राट ज्ञानेश्वर इंगोले (वय, २०) व अजय प्रल्हाद इंगोले (वय, १९) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. ही धडक इतकी भीषण होती की तरुणांच्या बाईकचा अक्षरशः चक्काचूर झाला.

दरम्यान, एकीकडे घरात लग्नसोहळ्याचा उत्साह असतानाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Mhada Home: खुशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त ५ लाखांमध्ये घर; नेमकं कुठे? अर्ज भरण्याची अंतिम तारीख कोणती?

Crime: तरुणाने जन्मदात्या आईचा घेतला जीव, चिमुकल्यासमोरच पाईपने मारहाण करत संपवलं; बीडमध्ये खळबळ

Shubman Gill: शुभमन गिलची ट्रिपल सेंच्युरी हुकली; मात्र विराट कोहलीचा महारेकॉर्ड मोडला, गावस्करांनाही टाकलं मागे

SCROLL FOR NEXT