Accident in Buldhana Saam
महाराष्ट्र

गर्भवती बायकोला भेटायला सासरी जात होता, दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; रस्त्यावर सोडले प्राण

Accident in Buldhana: बुलढाण्यातील विठ्ठलवाडी परिसरात भीषण अपघात. ३० वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू. गर्भवती पत्नीला भेटण्यासाठी जात असताना अपघात.

Bhagyashree Kamble

  • बुलढाण्यातील विठ्ठलवाडीत भीषण अपघात.

  • गर्भवती पत्नीला भेटण्यासाठी जात असताना तरूणाचा दुर्देवी मृत्यू.

  • अज्ञात वाहनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल.

बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी परिसरात भीषण अपघाताची घडली आहे. गर्भवती पत्नीला सासुरवाडीत भेटण्यासाठी निघालेल्या युवकाचा वाटेतच मृत्यू झाला. तरूण डोणगाव येथून अकोल्यातील नवेगावात गर्भवती पत्नीला भेटण्यासाठी गेला होता. तो दुचाकीवरून निघाला होता, अशी माहिती आहे. मात्र, वाटेतच दुचाकीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली. या अपघातात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

रूपेश दशरथ करवते (वय वर्ष ३०) असे मृत तरूणाचे नाव आहे. युवक मेहकर येथील डोणगावचा रहिवासी होता. तो एका संस्थेत व्हिडिओ एडिटर म्हणून कार्यरत होता. २१ सप्टेंबर रोजी तरूण रात्रीच्या सुमारास गर्भवती बायकोला भेटण्यासाठी अकोल्यातील नवेगावच्या दिशेनं निघाला होता. तो दुचाकीनं निघाला होता.

मात्र, विठ्ठलवाडीत रूपेशच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहन अचानक दुचाकीसमोर आले. नंतर दुचाकीला जोरदार धडक बसली. यामुळे रूपेशचा दुचाकीवरून तोल गेला. तो रस्त्यावर कोसळला. गंभीर जखमी झाल्यानं रूपेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले आहे. तसेच घटनेचा पंचनामा केला आहे. आरोपी अज्ञात वाहनचालक सध्या फरार आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Income Tax Refund: ITR फाइल केला पण रिफंड आलाच नाही? आयकर विभागाने कारणे सांगितली, वाचा

गोपीचंद पडळकर औरंगजेब, गुणरत्न सदावर्ते शाहिस्तेखान आणि लक्ष्मण हाके अफजलखान|VIDEO

Kohinoor Diamond : मौल्यवान आणि दुर्मिळ कोहिनूर हिऱ्याची किंमत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

Chikhali Crime : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून १० लाखांची रोकड लंपास; चिखली शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये तहसीलदाराच्या दालनातच शेतकऱ्याचा आत्महत्याची प्रयत्न

SCROLL FOR NEXT