buldhana accident  Saam
महाराष्ट्र

Accident : पुण्यातील लग्नाहून परत येताना भीषण अपघात, रिक्षाला जोरात धडक, २ जणांचा जागीच मृत्यू

Buldhana accident news : बुलढाणा जिल्ह्यातील मांडवा फाट्यावर भीषण अपघातात दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू. लग्नाहून परतताना लोडिंग रिक्षाला धडक. परिसरात शोककळा, स्थानिकांकडून सुरक्षेची मागणी.

Namdeo Kumbhar

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी

Buldhana Mandwa Phata accident two killed details : सिंदखेड राजा तालुक्यातील मांडवा फाट्यावरील टी-पॉइंट वळणावर ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास भरधाव दुचाकीची लोडिंग रिक्षाला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही पुण्याहून बिबी येथे लग्नासाठी आले होते. लग्न आटोपून आपल्या अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी या गावी दुचाकीने जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोशन नांदुरकर आणि शुभम वंजाळे हे पुण्याहून बिबी येथे लग्नासाठी आले होते. तेथून आपल्या गावी परतत असताना त्यांच्या भरधाव दुचाकीने (क्रमांक MH 27 BH 6276) मलकापूर पांग्राकडून येणाऱ्या लोडिंग रिक्षाला (क्रमांक MH 21 5364) जोरदार धडक दिली. या अपघातात रोशन नांदुरकर (वय २९) यांचा जागीच मृत्यू झाला.

शुभम पांडुरंग वंजाळे (वय २८, रा. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) हा गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी मलकापूर पांग्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील, रवी चव्हाण, दिनेश चव्हाण व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मलकापूर पांग्रा येथील स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

मलकापूर पांग्रा, बिबी तसेच दुसरबीड टी-पॉइंट येथे दिशादर्शक फलक नसल्यामुळे येथे वारंवार अपघात घडतात. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन तिथे गतिरोधक व दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने खरेदीदारांच्या खिशाला कात्री, सलग चौथ्या दिवशी दरवाढ; आजचा ताजा भाव काय?

Maharashtra News Live Update: कृषी शिक्षणात महाराष्ट्र पडला मागे... राष्ट्रीय मानांकन यादीतून राहुरी कृषी विद्यापीठ ' आऊट '

Paper Leak: मोदींची 'फास्ट ट्रॅक कोर्ट'ची घोषणा, राहुल गांधींचा पलटवार; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह केल्या 'या' ३ मोठ्या मागण्या

ITR Filing 2026: 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर मोठा आर्थिक फटका; प्रत्येक करदात्याने ही बातमी एकदा वाचाच

Bollywood Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध अभिनेत्री चढली बोहल्यावर; नवऱ्यासाठी केली खास पोस्ट, पाहा लग्नाचे PHOTOS

SCROLL FOR NEXT