buldhana accident news Bike rider dies in collision with train in shegaon taluka incident Saam TV
महाराष्ट्र

Budhana Accident News: नको ते धाडस करणं जीवावर बेतलं, रेल्वेच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Shegaon Accident News: रेल्वे रुळालगत असलेल्या छोट्याशा वाटेतून दुचाकी चालवणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही

Budhana Accident News: रेल्वे रुळालगत असलेल्या छोट्याशा वाटेतून दुचाकी चालवणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं. समोरुन आलेल्या सुपरफास्ट एक्सप्रेस धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रविवारी दुपारच्या सुमारास शेगाव तालुक्यातील आळसना गावाजवळ घडली. समाधान महादेव नरवाडे (वय 35 वर्ष, राहणार जलंब) असं मृत तरुणाचं नाव आहे. (Latest Marathi News)

मुसळधार पावसामुळे एकफळ ते आळसना रस्त्यावर (Buldhana News) पाणी साचल्याने जलंबवरुन शेगाव तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे दुचाकीस्वार रेल्वेरुळालगत असलेल्या छोट्याशा वाटेतून जीव धोक्यात घालून गाडी चालवत आहेत.

जलंब येथील समाधान महादेव नरवाडे हा तरुण शेगाव येथील एका किराणा दुकानावर कामावर होता. खराब रस्त्याअभावी समाधान दररोज रेल्वेट्रॅकच्या (Railway) बाजूने असलेल्या वाटेतून दुचाकीने प्रवास करीत होता. रविवारी देखील तो कामावर जाण्यासाठी निघाला.

दरम्यान, पाऊलवाटेवरून जात असताना मुंबईवरून नागपूरकडे जाणाऱ्या एका सुपरफास्ट एक्सप्रेसने आळसना गावाजवळ समाधानच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत समाधान ट्रेनखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

एकफळ ते आळसना या रस्त्यासाठी परिसरातील काही शेतकऱ्यांनी आपली शेती देण्यासाठी सुरुवातीला नकार दिल्याने हा रस्ता अळगळीत पडलेला होता. आता शेतकऱ्यांनी संमती दिल्याने हा मार्ग होणार आहे. मात्र, तोपर्यंत या भागातील नागरिक जीव मुठीत घेऊन रेल्वेरूळ ओलांडतात त्यातूनच असे अपघात घडत असल्याचं समोर आलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT