IND vs AUS: मालिका विजयानंतर टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज; पाकिस्तानचं स्वप्न भंगलं, नेमकं काय घडलं?

ICC One Day Ranking: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयानंतर टीम इंडियाला (Team India) आणखी एक गुड न्यूज मिळाली असून पाकिस्तानचं स्वप्न भंगलं आहे.
another good news for team india after win 2nd odi against australia Big Blow To Pakistan Cricket team
another good news for team india after win 2nd odi against australia Big Blow To Pakistan Cricket teamSaam TV
Published On

ICC One Day Ranking Top Team 2023

श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलची दमदार शतकी खेळी, सूर्यकुमार यादवची विस्फोटक फलंदाजी आणि गोलंदाजीत रविचंद्रन आश्विनने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर तब्बल ९९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्याची वनडे मालिका २-० अशी खिशात घातली. (Latest Marathi News)

another good news for team india after win 2nd odi against australia Big Blow To Pakistan Cricket team
IND vs AUS 2nd ODI Match: शानदार, जबरदस्त! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर मोठा विजय, वनडे मालिकाही खिशात

मालिका विजयानंतर टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज

दरम्यान, या विजयानंतर टीम इंडियाला (Team India) आणखी एक गुड न्यूज मिळाली असून पाकिस्तानचं स्वप्न भंगलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया वनडे मालिकनंतर विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेला जाण्यापूर्वी टीम इंडिया आता अव्वल क्रमांकावरच असणार आहे. भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी सामना होणे बाकी आहे.

या सामन्यात जरी पराभव झाला, तरी भारतीय संघ अव्वल (ICC Ranking) स्थानावरच राहणार आहे. तिसऱ्या वनडे सामना जर टीम इंडियाने गमावला तरीही ते या मालिकेत २-१ असा विजय साकारू शकतात. दरम्यान, भारताने जर दुसरा सामना गमावला असता तर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांना अव्वल स्थानावर जाण्याची संधी होती. पण या मालिकेनंतर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या कोणत्याही वनडे मालिका होणार नाहीत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडेचा धावता आढावा.

  • ऑस्ट्रेलियाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने ५० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात ३९९ धावांचा डोंगर उभा केला.

  • टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलने दमदार शतकं झळकावली. याशिवाय केएल राहुल आणि सूर्यकुमार यादवने अर्धशतकं ठोकली.

  • प्रसिद्ध कृष्णाने पावर प्लेमध्ये दमदार गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले. त्यानंतर पावसाने व्यत्यय आणल्यामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार ऑस्ट्रेलियाला ३३ षटकात ३१७ धावांचं लक्ष मिळालं.

  • ३१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ २१७ धावांवर ढेपाळला. टीम इंडियाने हा सामना ९९ धावांनी खिशात घातला.

  • भारताकडून रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स, तर प्रसिद्ध कृष्णाने २ विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहमद शमीने एका फलंदाजाला माघारी पाठवलं

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com