buldhana  संजय जाधव
महाराष्ट्र

मुलगा नाही म्हणून काय झालं...! वधुपित्याने काढली चक्क आपल्या लाडक्या लेकीची घोड्यावरून वरात

आपल्या देशात शक्यतो मुलाच्या लग्नात मोठी हौस मौज करत असतात.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: आपल्या देशात शक्यतो मुलाच्या लग्नात मोठी हौस मौज करतात, पण हीच परंपरा मोडीत काढत एका दाम्पत्याला मुलगा नाही, म्हणून मुलीच्या लग्नात (wedding) आपल्या लाडक्या लेकीची घोड्यावरून वरात काढून आपली लग्नातील हौस मौज केली आहे. लग्नाच्या रेशिमगाठीचे क्षण स्मरणीय करण्या- करता लग्नात कोणतीच कसर ठेवल्या जात नाही.

हे देखील पहा-

कधी वरात हेलिकॉप्टर (Helicopter) कधी बैलगाडी (Bullock cart) कधी मोटरसायकल यावर आपण पाहिली असेल ती पण नवरदेवाची. पण नवरी मुलीची वरात येथे घोड्यावर काढली आहे. दोन वर्षाच्या कोरोना (Corona) प्रादुर्भावामुळे सर्वकाही ठप्प झाले होते. त्यातच लग्नकार्य जे धूमधडाक्याने साजरे होतात त्यावर देखील निर्बंध (Restrictions) आले होते. पण आता काही प्रमाणात नियम शिथिल झाल्यामुळे पुन्हा एकदा बँडबाजे वरात मंडळी डिजेवर नाच गाणे पुन्हा एकदा दिसू लागले आहे.

यातच बुलढाण्यातील खामगाव येथील विजयराव सांगळे व पुष्पा सांगळे यांची मुलगी समीक्षा हिचा विवाह प्रित्यर्थ तिचे तीची वरात चक्क घोड्यावर काढून एक आदर्श ठेवला असे म्हणावे लागेल. कारण विजयराव यांना दोन्ही मुली असताना आपल्याला मुलगा नाही याचं शल्य न ठेवता त्यांनी आपल्या मुलीची वरात घोड्यावरून काढली आहे. आज मुला- मुलींमध्ये भेद नाही. मुलगा मुलगी एक समान असे अनेक जनप्रबोधन केले जातात पण कृतीतून आदर्श सांगळे परिवाराने ठेवला आहे. तो निश्चित कौतुकास्पद आहे, असे म्हटल्यास वावग ठरणार नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT