Buldana  Saam Tv
महाराष्ट्र

Buldana: लग्न जुळत नसल्याने निराशा, स्वतःचे सरण रचून त्यात उडी घेत तरुणाची आत्महत्या

अविवाहित तरुणाने स्वत:चेच सरण रचून त्यात उडी घेत आत्महत्या केली.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा: अविवाहित तरुणाने स्वत:चेच सरण रचून त्यात उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा येथील खामगावात घडला आहे. खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथे ही घटना घडली (Buldana man commit suicide by burn himself in khamgaon).

महेंद्र नामदेव बेलसरे असं आत्महत्या (Suicide) केलेल्या 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे. गावालगत असलेल्या आपल्या शेतामध्ये महेंद्र बेलसरे या तरुणाने रात्री साडे सात वाजताच्या सुमारास सरण रचले. त्यानंतर त्याने सरणाला आग लावली आणि स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून थेट सरणामध्ये उडी घेतली. यामध्ये त्याचा होरपळून मृत्यू झाला.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.

महेंद्रने इतक्या धक्कादायक पद्धतीने आपली जीवन यात्रा का संपवली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या तरुणाचे लग्न जुळत नसल्याने त्याने निराशेपोटी आत्महत्या केली, अशी चर्चा गावात आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

SCROLL FOR NEXT