नाशकात हत्यांचं सत्र सुरूच; डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

नाशिकमध्ये हत्यांचं सत्र सुरूच; डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या

शहरातील पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्नचिन्ह

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिक : नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटना Crime In Nashik दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. शहरात एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ वादातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हे देखील पहा-

मरेपर्यंत डोक्यावर घातले दगडाचे घाव;

म्हसरूळ Mhasrul Nashik परिसरात आरटीओ ऑफिसजवळ तरुणाची हत्या करण्यात आली आहे. डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. तरुण मरेपर्यंत डोक्यावर घातले दगडाचे घाव घातले गेले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे शहरातील पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. राजू शिंदे अस मयत तरुणाचे नाव आहे.

हत्येचं कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे भाजीपाल्याचे छोटं दुकान आहे, दुकानाच्या वर्चस्व वादातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी Nashik Police गुन्हा दाखल केला असून हत्येचा अधिक तपास सुरू आहे. सर्व दिशेने पोलीस आपला तपास करत आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

Blanket Cleaning Tricks: ब्लँकेट्सना येतोय कुबट वास? घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: अरविंद पाटील निलंगेकरांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा दणका!

SCROLL FOR NEXT