अहमदनगरमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे नुकसान

अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील भात शेतीचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले
अहमदनगरमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे नुकसान
अहमदनगरमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे नुकसानगोविंद साळुंके

अहमदनगर : अकोले Akole तालुक्यातील आदिवासी Tribal पट्ट्यातील भात paddy शेतीचे अवकाळी पावसाने rain मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भात कापणीच्या हंगामात अवकाळी पाऊस आल्याने भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कष्टाने पिकवलेल्या पिकांची डोळ्यादेखत नुकसान होताना बघावं लागत आहे. हाता- तोंडाशी आलेला घास असमानी संकटाने हिरावून नेल्याने आदिवासी शेतकरी राजा पुन्हा आर्थिक संकटात सापडणार आहे.

हे देखील पहा-

अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात भात हे मुख्य पीक असल्याने या पिकाकडे शेतकरी विशेष लक्ष देऊन उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतो. चालू हंगामात पावसाने उशिरा हजरी लावल्याचे बघायला मिळाले आहे. यामुळे भात लागवड उशिरा झाल्याने यंदा हंगाम संपण्यास उशीर लागत होता. उशिरा येणारे भाताची कापणी अद्यापही सुरू होती. सुमारे ५० टक्के क्षेत्रावरील भात कापणी अद्यापही बाकी होती.

अहमदनगरमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे नुकसान
नगर हादरलं! सुनेने भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत सासऱ्याची केली निर्घृण हत्या; कारण ऐकाल तर व्हाल थक्क

या सर्वांवर अवकाळी पावसाने पाणी फिरवल्याने अक्षरशः कापणी केलेले भात पाण्यात तरंगत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. जागोजागी शेतकऱ्यांनी तयार केलेली खळे पाण्यात डुंबून गेले आहेत. गावोगावी नैराश्याचे वातावरण असून यातून बाहेर येण्यासाठी गरीब शेतकऱ्यांची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. सरकारकडून गावोगावी नुकसानाची पाहणी व नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा, खिरविरे, एकदरे ,जाईनावाडी, पिंपळदरावाडी, कोकणवाडी, बिताका, शिवाजीनगर, तिरडे, पाचपट्टा, देवगाव, लाडगाव या गावात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com