Beed Saam
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: “भावाला सोडा, काही करू नका, २० वेळा विनंती तरी हत्या”; धनंजय देशमुखांनी सांगितला "त्या" दिवशीचा घटनाक्रम

CID and SIT File Chargesheet in Sarpanch Case Reveal Shocking Facts: संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुख यांनी जबाब दिला. त्यांचा जबाब साम टीव्हीच्या हाती लागला आहे, आणि त्यामधून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत.

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला १०० दिवस उलटले. देशमुख क्रूर हत्येप्रकरणी सीआयडी आणि एसआयटीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणात सरंपचांचे बंधू धनंजय देशमुख यांचा जबाब साम टीव्हीच्या हाती लागला आहे. त्यातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.

"भावाला सोडा काही करू नका"

धनंजय देशमुख यांनी आपल्या जबाबात स्पष्ट सांगितलं की, बंधू संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांनी आरोपी विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडला अनेकदा फोन केले होते. फोनवरून त्यांनी आपल्या भावाला सोडण्याची २० हून अधिकवेळा विनंती केली होती. मात्र, विनवणी करूनही आरोपींनी ऐकले नाही, असे धनंजय देशमुख म्हणाले.

धनंजय देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी विष्णू चाटे यांनी वारंवार सांगितले की, दहा मिनिटात सोडतो, वीस मिनिटात सोडतो..अर्ध्या तासात सोडतो. पण त्यांनी संतोष देशमुख यांना सोडलं नाही. त्यांची क्रूर हत्या करण्यात आली आहे.

धमकी आधीच देण्यात आली होती

धनंजय देशमुख यांच्या जबाबात आणखी एक महत्त्वाचा उल्लेख आहे. संतोष देशमुख यांना खंडणीच्या आड येऊ नकोस, नाहीतर जीवे मारू, अशी धमकी विष्णू चाटे याने याआधीच दिली होती. धनंजय यांनी सांगितले की, त्यांनी या धमकीनंतरही केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली होती. मात्र, त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडत गेली. शेवटी भावाची निर्घृण हत्या करण्यात आली.

आवादा एनर्जी प्रकल्पावर मारहाणीची माहिती

धनंजय देशमुख यांना त्यांच्या मित्रांकडून माहिती मिळाली होती की, अवादा एनर्जी प्रकल्पावर संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली आहे. हीच माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने आरोपींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी संतोष देशमुख यांना वारंवार मारहाण करण्यात आली. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT