Chhatrapati Sambhaji Nagar News Saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar News: ‘ताई मला माफ कर’, बहिणीच्याच घरी भावानं आयुष्याचा शेवट केला; नेमकं कारण काय?

Rakshabandhan 2023: उद्योगनगरी वाळूज परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाने आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Priya More

नवनीत तापडिया, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar: बहीण-भावाच्या प्रेमाचे अतुट नातं असलेल्या रक्षाबंधन सण (Rakshabandhan Festival 2023) आज संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. रक्षाबंधननिमित्त बहिणीच्या घरी जाऊन भावाने आत्महत्या केली. उद्योगनगरी वाळूज परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाने आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्योग नगरी वाळूज परिसरातील बजाजनगरातील छत्रपती नगरमध्ये ही घटना घडली आहे. आकाश सर्जेराव शिंदे (३० वर्षे) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश छत्रपती नगरमध्ये राहणाऱ्या आपल्या बहिणीच्या घरी रक्षाबंधनानिमित्त आला होता. याच ठिकाणी त्याने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवलं.

‘ताई मला माफ कर’ असे लिहून ठेवत या तरुणाने बहिणीच्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. आकाश शिंदे हा नांदेड जिल्ह्यातल्या खैरका या गावामध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. आकाशने हे टोकाचे पाऊल का उचलले यामागचे कारण अस्पष्ट आहे. पण त्याच्या जाण्यामुळे बहिणीला मोठा धक्का बसला आहे.

या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आकाशचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयामध्ये पाठवला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच ही घटना घडल्यामुळे वाळूज परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणाचा तपास वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT