Rajewadi lake overflow  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Update : मान्सूनच्या सुरुवातीला मिळाली आनंदाची बातमी; महाराष्ट्रातील पहिला तलाव भरला, शेतकरी सुखावला,VIDEO

Rajewadi lake overflow : महाराष्ट्रातील पहिला तलाव भरल्याची माहिती मिळत आहे. मे महिन्यातच राजेवाडी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

ओंकार कदम

राज्यात मान्सूनला सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. महाराष्ट्रातील साताऱ्यातही गेल्या पाच-सहा दिवसांपासून कोसळधार पाऊस सुरु आहे. या कोसळणाऱ्या पावसामुळे माण तालुक्याचं पाण्याचं काहीसे टेन्शन मिटलं आहे. या मुसळधार पावसामुळे माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तसेच ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. राजेवाडी तलाव भरल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

साताऱ्यातील माण तालुक्यातील दहिवडीसह म्हसवड परिसरात सलग 5 ते 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या ५ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुले माण तालुक्यात जीवन विस्कळीत झालं आहे. तालुक्याच्या पश्चिमेस पावसाचा जोर वाढलाय. यामुळे माणगंगा परिसरात सततच्या पावसाने माणगंगा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे.

मे महिन्यातील मुसळधार पावसाने माणगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. ही इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. उन्हाळी अवर्तनाचे जिहे कठापूर योजनेचे पाणी माणगंगेत सोडण्यात आले होते. त्यात पावसानेही साथ दिली.

मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव पूर्ण भरलाय. त्यामुळे मे महिनाच्या सुरुवातीला या तलावात १० फूट पाणी पातळी होती. राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने वाहण्यासाठी २५ फूट पाणीसाठा होणे गरजेचे असतं. माणगंगा दुथडी भरुन वाहिल्याने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, हवामान विभगाने मंगळवारी पावसाचा इशारा दिला होता. यात अहिल्यानगर, कोल्हापूर, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, परभणी, पुणे, सांगली, सातारा, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश होता. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली होती. तसेच प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT