Breaking News | राजू शेट्टींचं नाव वगळलं नाही : शरद पवार
Breaking News | राजू शेट्टींचं नाव वगळलं नाही : शरद पवार SaamTv
महाराष्ट्र

Breaking News | राजू शेट्टींचं नाव वगळलं नाही : शरद पवार

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव वगळल्याची चर्चा सकाळापासूनच राज्यभरात सुरु आहे. यावर खुद्द राजू शेट्टी यांनी देखील राष्ट्रवादीचा "करेक्ट कार्यक्रम" करणार असा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाच डायलॉग म्हणत नाराजीवजा इशारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादीविरोधात सोशल मीडियात संमिश्र प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले.

हे देखील पहा -

परंतु, या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांनी औरंगाबादमध्ये केला असून, शेट्टींचं नाव या यादीतून वगळले नसल्याची स्पष्टोक्ती देखील दिली आहे. तसेच राजू शेट्टी हे जरी करेक्ट कार्यक्रम कार्यक्रम करणार म्हणत असतील, तर ते वाक्य राष्ट्रवादीसाठीच आहे हे कशावरून असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करत राज्यपालांना दिलेल्या यादीत कोणताही बदल करण्यात आला नसून राजू शेट्टींचे नाव वगळण्यात आले नसल्याची स्पष्टोक्ती दिली आहे. राजू शेट्टी यांचे शेती व सहकार क्षेत्रातील काम मोठे असून त्याआधारेच त्यांच्या नावाची शिफारस विधानपरिषदेसाठी करण्यात आली असून, आम्ही आमचा दिलेला शब्द प्रामाणिकपणे पाळला आहे. त्यामुळे राज्यपाल शेट्टींच्या नावाचा विचार करतील असे विधान देखील पवारांनी केले आहे. शेट्टींच्या नाराजीवर मात्र पवारांनी भाष्य करणे टाळले आहे.

By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone 14 च्या किंमतीत आणखी झाली घट, सेलमध्ये स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Ajit Pawar On Rahul Gandhi | गांधी घराण्यावर बोलताना अजितदादा चुकले! पुढे काय घडलं?

Uttam Jankar News | Sharad Pawar यांच्यासमोरच अजित पवारांना कावळ्याची उपमा, जानकरांनी सभा गाजवली..

Nashik Onion Export News | शेतकऱ्यांना दिलासा! कांदा निर्यातबंदी हटवली...

Health Tips: पिकलेली की कच्ची कोणती केळी आहे आरोग्यासाठी फायदेशीर?

SCROLL FOR NEXT