PM Narendra Modi On Chhatrapati Shivaji Maharaj:  Saamtv
महाराष्ट्र

PM Narendra Modi: छत्रपती शिवराय आमचे आराध्य दैवत, नतमस्तक होऊन माफी मागतो: पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi On Chhatrapati Shivaji Maharaj collapsed statue: लताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना वेदनादायी असल्याचे म्हटले. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली.

Gangappa Pujari

पालघर, ता. ३० ऑगस्ट २०२४

PM Narendra Modi Apologies on Sindhudurg Incident: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पालघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचा पायाभरणीचा शुभारंभ केला जात आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना वेदनादायी असल्याचे म्हटले. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली.

PM मोदींनी जाहीर सभेत मागितली माफी!

कार्यक्रमामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सिंधुदुर्गवरील घटनेवरुन भाष्य केले. "सिंधुदुर्गमध्ये जे झालं ते वेदनादायी आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त राजे, महाराज नाहीत. आमच्यासाठी, आमच्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत आहेत. मी आज नतमस्तक होऊन माझ्या आराध्यदैवताच्या चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

छत्रपती शिवराय आराध्य दैवत!

"आमचे संस्कार वेगळे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा काहीही मोठे नाही. काहीजण स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देतात. अपमानित करतात. जनतेच्या भावना दुखावतात. मात्र माफी मागत नाहीत, हे आमचे संस्कार नाहीत," असे म्हणत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली.

वाढवण बंदर सर्वात मोठे पोर्ट!

तसेच या पोर्टसाठी ७५ हजार कोटीहून अधिक जास्त रक्कम आम्ही खर्च करणार आहो. वाढवण बंदर हे देशातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट असेल. देशातीलच नव्हे तर जगातील मोठे पोर्ट असेल, देशातील सर्व पोर्टमधून जेवढे कंटेनर येतील जातील, त्याच्यापेक्षा जास्त कंटेनरचे काम एकट्या वाढवण बंदरात होणार आहे. यावरुन तुम्ही तुम्ही अंदाजा लावू शकता, हे पोर्ट महाराष्ट्र आणि देशाच्या व्यापाराचा औद्योगिक प्रगतीचं किती मोठं केंद्र होईल, असा विश्वासही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीची टीका!

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली आहे. भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळे महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT