NIA Raid Saam Tv
महाराष्ट्र

NIA Raid: महाराष्ट्रात एनआयए, एटीएसची मोठी कारवाई! छत्रपती संभाजीनगर, जालन्यात छापेमारी; ३ संशयित ताब्यात

डॉ. माधव सावरगावे

NIA ATS Raid Maharashtra: महाराष्ट्रामध्ये एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्था आणि एटीएसने ( दहशतवाद विरोधी पथक) मोठी कारवाई केली आहे. एनआयए आणि एटीएसने संयुक्तपणे आज पहाटेपासूनच महाराष्ट्रातील तीन ठिकाणी छापेमारी आणि कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव येथे कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एनआयएकडून देश विघातक कार्य करणाऱ्या तरुणांवर देशभरात कारवाई सुरु आहे. देशभपरात अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. आज पहाटेपासून महाराष्ट्रामध्येही तीन ठिकाणी एनआयए आणि एटीएसच्या पथकाने छापेमारी आणि कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव येथे ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

जालना शहरातील रामनगर चमडा बाजार परिसरात एका संशयिताची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. सकाळी चार वाजल्यापासून एनआयएकडून चौकशी सुरु होती. चौकशी सुरू असलेला तरुणहा चमड्याचा व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर शहरातील आझाद चौक परिसरामध्ये आणि किराड पुरा भागामध्ये एनआयए तसेच एटीएसने छापेमारी केली.

दुसरीकडे नाशिकच्या मालेगाव शहरातील पावरवाडी रोडवरील अब्दुल्लानगर मधील एका डॉक्टरच्या होमिओपॅथी क्लिनिक वर NIA ने छापा टाकला. याठिकाणी रात्रीपासून चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मालेगावमध्ये इतरही काही ठिकाणी केंद्री. संस्थांनी छापा टाकल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, या कारवाईत विघातक काम करणाऱ्या आणि जम्मू काश्मीरमधील संघटनांशी संबंध असणाऱ्या काही तरुणांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bombay Vada pav : तुम्ही मुंबईत राहत असाल तर वडा पाव हा तुमच्या सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय असेल.

PM Modi : पंतप्रधान मोदींची विरोधकांवर कठोर शब्दांत टीका; पाहा Video

Marathi News Live Updates : सांगलीमध्ये ४० ते ५० जणांना भगरीच्या तांदळातून विषबाधा

Rekha: मी प्रेमाला नाही तर 'बिग बी'ला घाबरते, अभिनेत्री रेखाचा मोठा खुलासा; पाहा VIDEO

Irani Cup 2024: मुंबई'अजिंक्य'! २७ वर्षांची प्रतिक्षा संपवत कोरलं इराणी ट्रॉफीवर नाव

SCROLL FOR NEXT