Maharashtra Politics : शरद पवारांचे महायुतीला धक्क्यावर धक्के; पाटील, घाटगेंनंतर आता शिंदे तुतारी घेणार

Sharad pawar News : शरद पवारांचे महायुतीला धक्क्यावर धक्के देणे सुरु आहे. हर्षवर्धन पाटील आणि समरजीत घाटगे यांनी शरद पवारांना साथ दिल्यानंतर बबनराव शिंदे तुतारी फुंकण्याची तयारी करत आहेत.
शरद पवारांचे महायुतीला धक्क्यावर धक्के; पाटील, घाटगेंनंतर आता शिंदे तुतारी घेणार
Maharashtra PoliticsSaam tv
Published On

पंढरपूर : राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हर्षवर्धन पाटील आणि समरजीत घाटगे यांनी शरद पवारांना साथ दिली आहे. त्यानंतर पंढरपुरातील बडा नेता तुतारी फुंकणार आहे. त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे अजित पवारांची साथ सोडणार असल्याचं बोललं जात आहे.

माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे हे अजित पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत शिंदे हे अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. रणजितसिंह शिंदे हे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र आहेत. बबनराव शिंदे यांनी शरद पवारांकडे उमेदवारीची मागणी केली होती. त्यानंतर आज बबनराव शिंदे यांनी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. बबनराव शिंदे यांच्या भूमिकेने माढ्यात अजित पवार यांच्यासह महायुतीला मोठा धक्का बसला आहे.

शरद पवारांचे महायुतीला धक्क्यावर धक्के; पाटील, घाटगेंनंतर आता शिंदे तुतारी घेणार
Harshvardhan Patil: फडणवीसांचा प्रस्ताव, शरद पवारांची ऑफर, भाजप सोडताना पाटील काय काय म्हणाले?

आमदार बबनराव शिंदे यांनी भूमिका स्पष्ट करताना म्हटलं की, ' दादा, तुम्ही ३८ वर्षे शरद पवारांसोबत काम केलेय. दोन वर्षांपासून तुम्ही साहेबांपासून दूर गेला आहात. तुम्ही कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार साहेबांना भेटून आलो. तिकिट मिळेल की नाही माहिती नाही. पण आगामी निवडणुकीमध्ये साहेबांनी रणजितला तिकिट दिले तर ठीक. नाहीतर मी त्याला अपक्ष उभं करणार आहे'.

दरम्यान, आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बबनराव शिंदे हे तुतारी फुंकणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. अशातच बबनराव शिंदे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून माघार घेत सुपुत्रासाठी मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे.

शरद पवारांचे महायुतीला धक्क्यावर धक्के; पाटील, घाटगेंनंतर आता शिंदे तुतारी घेणार
Ashok Chavan News : ते विधान चुकीचे व हास्यास्पद; राहुल गांधी यांच्या विधानावर अशोक चव्हाण यांचे उत्तर

मुलाला आमदारकीचं तिकीट मिळावं, यासाठी शरद पवारांची भेट घेतल्याचे बबनराव शिंदे यांनी जाहीर केले. त्यानंतर शरद पवारांनी तिकीट दिलं तर ठिक, नाहीतर अपक्ष उभ करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. बबनराव शिंदे यांच्या नव्या भूमिकेमुळे माढ्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com