Maharashtra Politics: माढामध्ये अजित पवारांचे टेन्शन वाढलं, बबनराव शिंदे तुतारी हाती घेणार?

Madha Vidhan Sabha Constituency: माढा विधानसभा मतदरासंघामध्ये निवडणुकीपूर्वी मोठा राजकीय भूकंप होणार आहे. आमदार बबराव शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे ते लकवरच पक्ष प्रेवश करणार असल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra Politics: माढामध्ये अजित पवारांचे टेन्शन वाढलं, बबनराव शिंदे तुतारी हाती घेणार?
Madha Vidhan Sabha ConstituencySaam Tv
Published On

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतील. पुण्यातील मोदीबाग येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट झाली. शरद पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता बबनराव शिंदे हे लवकरच तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. शरद पवार यांच्यासोबतच्या त्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. त्यामुळे ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी आज सकाळी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली. दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहेत. लवकरच ते मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या महिन्यामध्ये बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी तेव्हा देखील ते पुन्हा शरद पवार गटामध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी या भेटीदरम्यान शरद पवार पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असल्याचे म्हटले जात होते. आता पुन्हा त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे त्यांची घरवापसी निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

Maharashtra Politics: माढामध्ये अजित पवारांचे टेन्शन वाढलं, बबनराव शिंदे तुतारी हाती घेणार?
Maharashtra Politics : बीडमध्ये भाजपला मोठा धक्का, दिग्गज नेत्याने बंड पुकारले, राजकीय गेम केल्याचा आरोप!

अशामध्ये सोलापूरच्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये काका-पुतण्यामध्ये संघर्ष पहायला मिळणार आहे. आमदार बबनराव शिंदे यांच्याविरोधात पुतण्याने दंड थोपाटले. धनराज शिंदे यांनी नुकताच विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतची घोषणा केली. मानेगाव येथे धनराज शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यकर्ता मेळाव्यात निवडणूक लढवण्याची मोठी घोषणा धनराज शिंदे यांनी केली. घरातूनच आमदार शिंदे यांना मोठा विरोध असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आमदार बबनराव शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत. बबनराव शिंदे हे जर शरद पवार गटामध्ये गेले तर अजित पवारांचं देखील टेन्शन वाढणार आहे.

दरम्यान, रविवारी अकलूजमध्ये काँग्रेसची सभा झाली होती. सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमध्ये महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शन केले होते. महाविकास आघाडीच्या या सभेनंतर बबनराव शिंदे यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. माढा विधानसभा मतदारसंघामची जागा जर काँग्रेसला गेली तर बबनराव शिंदे यांची अडचण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचपार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवारांची आज भेट घेतली.

Maharashtra Politics: माढामध्ये अजित पवारांचे टेन्शन वाढलं, बबनराव शिंदे तुतारी हाती घेणार?
Maharashtra Politics : "देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संपवण्याचा प्लान, भाजपमधून तावडेंना पुढे आणलं जातंय"

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com