Sharad Pawar: इंदापुरात वारं फिरलं! हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेणार का? शरद पवार कार्यकर्त्यांना म्हणाले...

Sharad Pawar On Indapur Assembly Seat: हर्षवर्धन पाटलांच्या पक्षबदलाची चर्चा सुरु झाल्यानंतर इंदापूरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज बारामती येथे इंदापूरमधील हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेत उमेदवारीबाबत योग्य निर्णय घेण्याची विनंती केली.
Sharad Pawar: इंदापुरात वारं फिरलं! हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेणार का? शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला शब्द
Harshavardhan Patil News: Saamtv
Published On

बारामती, ता. २९ सप्टेंबर

Sharad Pawar On Harshavardhan Patil: भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील हे विधानसभेच्या तोंडावर पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून ते दत्तात्रय भरणेंच्या विरोधात विधानसभा लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हर्षवर्धन पाटलांच्या पक्षबदलाची चर्चा सुरु झाल्यानंतर इंदापूरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज बारामती येथे इंदापूरमधील हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेत उमेदवारीबाबत योग्य निर्णय घेण्याची विनंती केली.

Sharad Pawar: इंदापुरात वारं फिरलं! हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेणार का? शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला शब्द
Maharashtra Politics : वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, विधानसभेसाठी महायुतीचा गेम प्लॅन ठरला; मुंबईत काय घडलं?

गोविंद बागेत मोठी गर्दी

हर्षवर्धन पाटील यांचे पक्ष बदलाची संकेत दिल्यानंतर इंदापूरमधील राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज इंदापूरातून हजारोंच्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते शरद पवार यांना भेटण्यासाठी गोविंद बागेत आले होते. यावेळी विधानसभेसाठी इच्छुक असलेले आप्पासाहेब जगदाळे, तसेच सोनाईचे प्रवीण मानेही उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी इंदापूरच्या उमेदवारीबाबत योग्य निर्णय घेण्याची विनंती केली. यावेळी शरद पवार यांनीही लवकरच पक्षाची कोअर कमिटी इंदापुरात जाऊन सर्व्ह करेल आणि जनतेतून नवख्या उमेदवाराला संधी दिली जाईल, असा शब्द दिला.

शरद पवारांचा कार्यकर्त्यांना शब्द..

"महाराष्ट्रात लोकांमध्ये सध्या चर्चाही आहे की, कालपर्यंत इकडे होते, आज इथे येत आहेत. इंदापूरमध्येही ही चर्चा आहे, याची मला माहिती आहे. ही दबक्या आवाजाची चर्चा कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी आहे, याची नोंद आम्हा नेते लोकांना घ्यावी लागेल. मी तुम्हाला एवढेच सांगतो जो काही निर्णय घेतला जाईल तो संघटनेचे जिल्ह्याचे तालुक्याचे अध्यक्ष,बाकीचे पदाधिकारी यांना विचारात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल," असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar: इंदापुरात वारं फिरलं! हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेणार का? शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला शब्द
Crime News : लहान भावाला मारलं म्हणून त्यांनी थेट त्याचं जीवन संपवलं; पुण्यातील थरारक घटना

'इंदापूरमध्ये बदल घडणार...'

"आपल्या जिल्ह्यात उमेदवारांची संख्या फार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि लोकांच्यात चर्चा सुरू झाली आहे. सगळ्यांना विचारून निर्णय घेतला जाईल. निवडून येण्याची क्षमता बघितली जाईल. इंदापूरमध्ये बदल घडेल असे वातावरण आहे. तुम्ही निवडणुकीत कष्ट केले त्यामुळे तुम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे, आमदार राष्ट्रवादीचा हा निकाल घेऊन तुम्ही कामाला लागा," असे आदेशही यावेळी शरद पवार यांनी दिले.

Sharad Pawar: इंदापुरात वारं फिरलं! हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेणार का? शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला शब्द
Gujrat Road Accident: मोठी दुर्घटना! डिवायडर तोडून भरधाव बसची वाहनांना धडक; चार चिमुकल्यांसह ७ जण ठार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com