Indapur Politics: 'तुतारी' वाजवण्याआधीच वादंग, हर्षवर्धन पाटलांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; इंदापुरात काय घडतंय?

Harshavardhan Patil News: हर्षवर्धन पाटील हे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अशातच आता हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटातील स्थानिक नेत्यांचा विरोध पाहायला मिळत आहे.
Indapur Politics: 'तुतारी' वाजवण्याआधीच वादंग, हर्षवर्धन पाटलांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; इंदापुरात काय घडतंय?
Harshavardhan Patil News: Saamtv
Published On

सागर आव्हाड| इंदापूर, ता. २७ सप्टेंबर

Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुका तोंडावर असतानाच महायुतीला जोरदार धक्के बसत असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु आहे. विधानसभेआधी तुतारी हाती घेणाऱ्या नेत्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे बडे नेते हर्षवर्धन पाटील यांचेही नाव आघाडीवर आहे. हर्षवर्धन पाटील हे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अशातच आता हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटातील स्थानिक नेत्यांचा विरोध पाहायला मिळत आहे.

Indapur Politics: 'तुतारी' वाजवण्याआधीच वादंग, हर्षवर्धन पाटलांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; इंदापुरात काय घडतंय?
Maharashtra Politics: 'शरद पवार, उद्धव ठाकरेंना खतम करण्याचे डोहाळे', अमित शहांच्या वक्तव्याचा 'सामना'तून समाचार

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्याआधीच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना आता शरद पवार पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून विरोध पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून इंदापूर तालुक्यात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. 'इंदापूर तालुक्यातील मतदारांच्या मनात, नको आजी नको माझी इंदापूर तालुक्याला हवाय नवीन बाजी' अशा आशयाचे बॅनर्स झळकावले जात आहेत.

तसेच हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांचे बॅनर लावायचे बंद करा अशी मागणीही शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी शरद पवारांची भेट घेत निष्ठावंत कार्यकर्त्यांना इंदापूर विधानसभेचे तिकीट द्या म्हणून आग्रही मागणी करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे विधानसभेच्या रणसंग्रामाआधीच इंदापूरमध्ये राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसत आहे.

Indapur Politics: 'तुतारी' वाजवण्याआधीच वादंग, हर्षवर्धन पाटलांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; इंदापुरात काय घडतंय?
Mumbai Crime : पतीचे बाहेर लफडे, पत्नीकडून घटस्फोटाची मागणी; संतप्त नवऱ्याने केला ॲसिड हल्ला

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील यांनी पितृपक्षानंतर कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. तसेच लवकरच ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बॅनरही सोशल मीडियावर झळकत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतल्यास ते अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांना आव्हान देणार असून तुतारी विरुद्ध घड्याळ असा सामना पाहायला मिळणार आहे.

Indapur Politics: 'तुतारी' वाजवण्याआधीच वादंग, हर्षवर्धन पाटलांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; इंदापुरात काय घडतंय?
Badlapur Case: सोमवारपर्यंत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करा: हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com