Mumbai Crime : पतीचे बाहेर लफडे, पत्नीकडून घटस्फोटाची मागणी; संतप्त नवऱ्याने केला ॲसिड हल्ला

Husband Wife Dispute : पतीच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती मिळाल्यानंतर पत्नीने घटस्फोटाची मागणी केली. यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालं.
Mumbai Crime
Mumbai Crime Saam Tv
Published On

संजय गडदे, साम टिव्ही प्रतिनिधी

Mumbai Crime News : मुंबईचा मालाड मालवणी परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती मिळाल्यानंतर पत्नीने पतीकडे घटस्फोटाची मागणी केली यावरून दोघांमध्ये वाद झाल्याने संतप्त झालेल्या पतीने आपल्या पत्नीवर ॲसिड हल्ला करून तिला जखमी केले आहे. ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या 27 वर्षीय महिलेला महापालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोपी पती शब्बीर खान याने पत्नीच्या माहेरी जाऊन हा ॲसिड हल्ला केला आहे.परवा पहाटे साडेपाच वाजता हा ॲसिड हल्ला करण्यात आला.याप्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी शब्बीर खान याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 30 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ॲसिड हल्ल्यात जखमी महिला आणि आरोपी यांनी 2019 मध्ये प्रेम विवाह केला होता. परंतु पीडित महिलेला तिचा नवरा बेरोजगार आणि अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचे विवाहानंतर समजले. यावरून त्यांच्या सातत्याने वाद होऊ लागले दरम्यानच्या काळात शब्बीर खान याचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती पीडित महिलेला समजली. त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यापूर्वी महिला आपल्या आईच्या घरी मालाड येथे राहण्यासाठी गेली. याचाच राग आरोग्य शब्बीर खान याला आला. त्याने रागाच्या भरात पत्नीच्या माहेरी जाऊन परवा गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता तिच्यावर ॲसिड हल्ला केला त्या ॲसिड हल्ल्यात तिचे तोंड आणि हात भाजून जखमी झाले आहे.

जखमी अवस्थेत पीडीतेच्या आईने तिला महापालिकेचा विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे सध्या पिढीचे वर विचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी पीडीतेचा जबाब नोंदवून आरोपी पती शब्बीर खान विरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 124 (2), 311, 333 आणि 352 नुसार तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मालाड पोलिसांनी आरोपी पती शब्बीर खान याला अटक केली आहे मालवणी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 30 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com