Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याआधीच महायुती आणि मविआमधील अतंर्गत गटबाजी समोर येत आहे. भाजपला याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे दिसतेय. मित्रपक्षाला मतदारसंघ सुटल्यामुळे काही आमदारांनी वेगळी वाट धरण्याचा विचार केला आहे. इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील यांनी नवरात्रीमध्ये निर्णय घेणार असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. आता बीडमधील भाजप नेत्याने बंडाचे निशाण फडकावले आहे. मोहन जगताप यांनी भाजपवर गंभीर आरोप करत बंड पुकारण्याचे संकेत दिले आहेत.
बीडमधील भाजप नेते मोहन जगताप भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आज झालेल्या सभेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली. त्याशिवाय भाजपवर गंभीर आरोपही केले. गेल्यावेळेस माझा राजकीय गेम केला. ब्लॅकमेलिंग केलं आणि माझं तिकीट कापलं. मात्र मी आता ठरवलंय मी जनतेच्या दारात उभारणार, असे स्पष्ट मत मोहन जगताप यांनी व्यक्त केलेय.
राजकारणात थापा मारणं आणि लबाड बोलणं सुरु आहे. गेल्यावेळेस माझा राजकीय गेम केला, ब्लॅकमेलिंग केलं अन माझं तिकीट कापलं. मात्र मी आता ठरवलंय मी जनतेच्या दारात उभारणार आहे, असे मोहन जगताप म्हणाले.
पक्षाचे तिकीट मिळेल की नाही, हे सांगता येत नाही. मात्र मी तुमच्या तिकिटावर उभा राहणार आहे. काही टगे इकडे तिकडे फिरून तिकीट न मिळण्याचा प्रयत्न करतील. मात्र मी उभा राहणार आहे. तुम्हाला जर 10 टक्के घेणारा आमदार पाहिजे असेल तर मी हात जोडतो, अन्यथा मला साथ द्या, असे मोहन जगताप म्हणाले.
मी टक्केवारी घेणार नाही, जर मी चांगला आमदार म्हणून नाही राहिलो, तर माझं नाक कापून टाकील. त्यामुळं मी तुमच्या जीवावर नशीबासोबत मी संघर्ष करेल, असे वक्तव्य मोहन जगताप यांनी केलेय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.