तबरेज शेख, नाशिक|ता. १८ फेब्रुवारी २०२४
उद्या १९ फेब्रुवारी, छत्रपती शिवरायांचा जन्मदिन. राज्यभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात, जल्लोषात पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली असून शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यातील प्रत्येक शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिक पोलिसांनी सिंघम स्टाईल रूट मार्च काढला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवजयंतीच्या (Shivjayanti Utsav 2024) पूर्वसंध्येला नाशिक पोलिसांच्या (Nashik) वतीने शहरात पोलिसांचा सिंघम स्टाईल रूट मार्च काढण्यात आला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे त्याचबरोबर पोलिसांना मिरवणुकीचा आणि शिव पालखीचा मार्ग माहिती व्हावा यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला होता.
शहरातील संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिक परिसरात हा रूट मार्च काढण्यात आला यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी आणि होमगार्ड लाठी काठी घेईन मोठ्या संख्येत उपस्थित होते.कायद्या व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या मनात धडकी निर्माण व्हावी यासाठी पोलिसांचा सिंघम स्टाईल पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला होता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, या वेळी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, भद्रकाली पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पंचवटी पोलीस निरीक्षक मधुकर कड, आडगाव पोलीस ठाण्याचे प्रवीण चव्हाण, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे शर्माळे सरकारवाडा, यांच्या सह राज्य राखीव पोलीस बल होमगार्ड आणि पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.