Sudhir Mungantiwar  Saam tv
महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar: सुधीर मुनगंटीवार यांना मोठा दिलासा! ३३ कोटी वृक्ष लागवड प्रकरणात क्लीन चीट; मोहिम यशस्वी झाल्याचा अहवाल सादर

Sudhir Mungantiwar Tree Planting Scam: देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये वनमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वृक्ष लागवड योजनेतील घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा अहवाल चौकशी समितीकडून सादर करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

गणेश कवाडे| मुंबई, ता. १६ जुलै २०२४

कथित वृक्ष लागवड घोटाळा प्रकरणात माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ३३ कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा अहवाल चौकशी समितीकडून सादर करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये वनमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वृक्ष लागवड योजनेतील घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेत मोठा घोटाळा केल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला होता.

याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने विशेष समितीही नेमली होती. आता या समितीचा अहवाल समोर आला असून यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. या प्रकरणी समितीच्या चौकशीत कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.

या प्रकरणात सखोल चौकशी केली असता कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नाही. राज्यात मोहिम यशस्वी झाल्याचे समितीचे स्पष्ट मत आहे. तसेच मोहिम राबवताना काही अडचणी व त्रुटी राहिल्याचे अहवालात नमूद करण्यात आली असून त्रुटी व अडचणी दूर करण्यासाठी सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे राज्यात ५२ कोटी वृक्ष लागल्याची जमेची बाजू असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: फुटबॉल खेळताना खेळाडूच्या अंगावर पडली वीज; एकाचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Ambarnath News : अंबरनाथमध्ये उबाठाचे उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप; अपक्ष उमेदवार सुनील अहिरे यांची तक्रार

VIDEO : 'शाहू महाराजांविषयी आम्हाला आदरच, पण..', कोल्हापूरच्या वादावर पडदा पडणार? सतेज पाटलांची मोठी प्रतिक्रिया

Drashti Dhami Baby: दृष्टी धामीने दाखवला चिमुकल्या बाळाचा पहिला फोटो, नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

Maharashtra News Live Updates : उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल

SCROLL FOR NEXT