devendra fadnavis  saam tv
महाराष्ट्र

Jalna Lathi Charge: मोठी बातमी! अंतरवली सराटी लाठीचार्ज प्रकरणात गृहमंत्री फडणवीस निर्दोष

Jalna Lathi Charge Update: लाठीहल्ला प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्दोष असल्याचा महत्वाचा खुलासा झाला आहे.

Gangappa Pujari

Breaking News:

अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचाराबद्दल सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या या लाठीहल्ला प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्दोष असल्याचा महत्वाचा खुलासा झाला आहे. माहिती अधिकारातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंतरवली सराटी (Antarvali Sarati) येथे पोलिस कर्मचारी आणि मराठा आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्जचा आदेश दिल्याचा आरोप काहींकडून करण्यात येत होता. याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे.

या संपूर्ण लाठी हल्ला प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले नव्हते.. असं माहिती अधिकारातून समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी आरटीआय अर्ज केला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अर्जाला दिलेल्या उत्तरात आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश मिळाले नव्हते, अशी माहिती जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर सी शेख यांनी दिली आहे.

दरम्यान, १ सप्टेंबर रोजी जालन्यामध्ये मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये हा संघर्ष झाला होता. मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरणानंतर राज्यभरात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. ज्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT