CM Eknath Shinde On Jalna Lathi Charge: 'पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, चौकशीनंतर...', जालना लाठीचार्ज प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Jalna Lathi Charge News Update: जालना लाठीचार्ज प्रकरणी राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे.
CM Eknath Shinde On Jalna Lathi Charge
CM Eknath Shinde On Jalna Lathi ChargeSaam tv
Published On

Budldhana Shasan Apalya Dari News:

जालन्यातल्या अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज (Jalna Lathi Charge) करण्यात आला. याप्रकरणी सरकारने मोठी कारवाई केली आहे. सरकारने याप्रकरणी जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर कारवाई करत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुलडाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या 'शासन आपल्या दारी' (Shasan Aapalya Dari) या कार्यक्रमात मोठं विधान केले आहे.

'जालन्याचे एस पी, अतिरिक्त एस पी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. चौकशी झाल्यानंतर निलंबन करावं लागलं तर ते ही करू. त्याचसोबत याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी देखील करू.' असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.

CM Eknath Shinde On Jalna Lathi Charge
PM Narendra Modi Interview: भारतात भ्रष्टाचार आणि जातीयवादाला थारा नाही, जी-२० परिषदेपूर्वी दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी नेमकं काय म्हणाले?

बुलडाण्यातील या कार्यक्रमात जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की, 'जालन्यात दुर्दैवी घटना झाली त्याचे मलाही दुःख झाले. काही लोकं तिथे येऊन गेले. त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवली. ज्या लोकांनी मराठा आरक्षणाचे गळे घोटले. ते लोकं तिथे गळा काढायला गेले. महाविकास आघाडीच्या काळात सुप्रीम कोर्टात हे आरक्षण गेले. अशोक चव्हाण तुम्ही उपसमिती अध्यक्ष होते, तुम्ही काय केले?', असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी आधीच्या सरकारवर निशाणा साधला.

CM Eknath Shinde On Jalna Lathi Charge
Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे पुनरागमन; पुढील ४८ ते ७२ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा मुसळधार पावसाची शक्यता

'माजी मुख्यमंत्री यांनी मुक मोर्चाला 'मुका मोर्चा' असं संबोधले. मराठा समाज फार संयमी आहे. शांततेत असलेले आंदोलनात दगडफेक कुणी केली? सामाजिक सलोखा कोण बिघडवत आहे? तुम्ही राजकीय पोळू भाजू नका.' अशी विरोधकांवर टीका करत मुख्यमंत्र्यांनी 'साडे तीन हजार तरुणांना नियुक्त्या देण्याचे काम मी मुख्यमंत्री झाल्यावर केले.', असल्याचे सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.'जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो, तेव्हापासून आज सरकार जाणार, उद्या जाणार असं चालू झाले. सरकार पडता पडता, अजितदादा आले. आता म्हणतात मुख्यमंत्री बदलणार. मी काय तुमचं घोडं मारलंय? जनता माझ्याबरोबर आहे. आता सगळे ज्योतिषी बंद झाले.' अशी टीका त्यांनी केली.

CM Eknath Shinde On Jalna Lathi Charge
Student Killed Teacher : 14 वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकाला क्रूरपणे संपवलं, हत्येमागचं कारण ऐकून सगळेच हादरले

'रस्त्यावर उतरून काम करणारे आमचे सरकार आहे. ऑनलाईन किंवा फेसबुकवरुन काम करणारे आमचे सरकार नाही. त्यांच्या सरकारच्या काळात जाणीवपूर्वक प्रकल्प बंद पाडले.', असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. तसंच, 'गेल्या वर्षात ८ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. केंद्र सरकार नदी जोड प्रकल्पासाठी अनुकूल आहे. आम्ही 'लेक लाडकी' ही योजना करत आहोत. १८ वर्षे होईपर्यंत तिच्या खात्यात एक लाख रुपये जमा होतील.', असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com