वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेस अकेल्यातून उमेदवार देणार की नाही अशी चर्चा होती. मात्र आज अभय पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं असून अकोल्यात तिरंगी लढत होणार आहे.
लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथकाने मावळ तालुक्यातील सिंहगड, कासुर्डे, शिरगाव व अंबी या ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या ३ ठिकाणांवर दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत छापे मारून ३ गुन्ह्यांची नोंद करून १ लाख ४४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुणे
शरद पवार करणार २००० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
विद्यार्थ्यांच्या विविध समस्या आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी शरद पवार मैदानात
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होणार संवाद सोहळा
'अस्वस्थ तरुणाई, आश्वासक साहेब' असं या कार्यक्रमाचं नाव
अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन
नवी दिल्ली:
मद्यधोरण घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली
त्यानंतर पोलिसांनी केजरीवाल यांना आणलं तिहार जेलमध्ये
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान आहे. त्यामुळं पुढच्या दोन-तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. रत्नगिरी लोकसभेत माझा मतदारसंघ येत असल्यानं, मी तिथं दावा केला आहे. दुर्दैवाने पूर्वीचे खासदार आमच्यासोबत आले नाहीत. आजपर्यंत धनुष्यबाण चिन्हावरच लढवली असल्यानं ती जागा आम्हाला मिळावी, हा आमचा आग्रह आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये उमेदवारांची अदलाबदल होईल, याबाबत भाकित कशाला करायचं. दोन-तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईलच, असं शिवसेना नेते उदय सामंत यांनी सांगितलं.
आजची ही घटना राजकीय आहे. लोकशाही आहे. निवडणुकीत प्रत्येकाला जाऊन आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. घडलं काहीच नाही. काही लोकांनी घोषणाबाजी केली असेल तर करू द्या. माझं काही म्हणणं नाही, अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.
अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आज अशोक चव्हाण गेले होते. यावेळी मराठा तरुणांनी त्यांना विरोध करत त्यांची कार अडवली. या घटनेबाबत अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. आमचं सुद्धा मराठा आरक्षणाला समर्थन आहे. पुढेही समर्थन करत राहू. हा जो समज गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न केला जात आहे. लोकांची दिशाभूल करणारी ही काही राजकीय पक्षांची मोजकी माणसं आहेत, असंही ते म्हणाले.
मुंबई भाजप निवडणूक प्रभारींच्या बैठकीला सुरूवात
बैठक सुरू होताच अब की बार 400 पारच्या घोषणाबाजी
कालच भाजपच्या क्लस्टर समितीची पार पडली
त्यानंतर आज मुंबईतील निवडणूक प्रभारींची बैठक पार पडत आहे
मुंबईतील भाजपचे सर्व प्रमुख नेते बैठकीला उपस्थित
महायुतीच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या बैठका सुरू आहेत. सर्व जागा निवडून येतील अशी रणनीती आहे. दोन दिवसांत कोण- कुठली जागा लढवणार हे स्पष्ट होईल.संजय शिरसाट, प्रवक्ता, शिवसेना
नवी दिल्ली -
काँग्रेसला आयकर विभागाने पाठवलेल्या नोटिशीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी
लोकसभा निवडणूक होईपर्यंत कोणतीही वसुलीची कारवाई केली जाणार नाही - महाधिवक्ता
आयकर विभागाच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची सर्वोच्च न्यायालयात माहिती
निवडणुका आहेत त्यामुळे कारवाई करणार नसल्याची आयकर विभगाची भूमिका
नवी दिल्ली -
दिल्लीतील रामलीला मैदानात झालेल्या सभेत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केले आरोप
भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
भाजपचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगात जाऊन तक्रार करणार
नांदेड (Nanded)
माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना मराठा समाजाने घातला घेराव
चव्हाण यांची कार अडवून दिल्या घोषणा
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावातील प्रकार
मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहून अशोक चव्हाण माघारी फिरले
मद्यधोरण घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीने अटक केली होती. त्यांची ईडी कोठडीची मुदत आज संपली. त्यांना आज, सोमवारी कोर्टात हजर केले असता, १५ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे.
2014 च्या आधी बँकिंग क्षेत्र डळमळीत होतं, असं सांगतानाच एकेकाळी बुडणारी अर्थव्यवस्था आता नफ्यात असल्याचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील आरबीआयच्या कार्यक्रमात केले. देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, सध्याच्या घडीला भारतीय बँकिंग व्यवस्था जगात आदर्श समजली जाते. मागील दहा वर्षांत मोठे बदल करण्यात आले आहेत, असंही मोदी यांनी सांगितले.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशअध्यक्ष माढा लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक
प्रवीण गायकवाड यांनी घेतली शरद पवार यांची भेट
शरद पवार (Sharad Pawar) दिल्लीत असताना प्रवीण गायकवाड यांनी घेतली भेट
मोहिते पाटील जर माढा लढणार नसतील तर मी निवडणुकीसाठी तयार असल्याचा दावा प्रवीण गायकवाड यांनी केला आहे
माढा लोकसभा संदर्भात शरद पवार आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष
प्रवीण गायकवाड हे शरद पवार यांच्या जवळचे असल्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन शरद पवार नवी खेळी खेळणार का?
मुंबई भाजपची आज दुपारी 2 वाजता महत्वाची बैठक
मुंबई भाजपच्या निवडणूक प्रमुखांची आज दुपारी बैठक
महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीसाठी नेमलेले प्रभारी नेते खासदार दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक
भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजप आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे इतर नेते राहणार उपस्थित
मुंबईतल्या 6 लोकसभा मतदार संघाचा घेणार आढावा
माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या विरोधात रोड मराठा उमेदवार ?
हरियाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत
हरियाणातील कर्नाल मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी पक्ष आग्रही
वीरेंद्र वर्मा यांच्या नावाची पक्षाकडून चर्चा
काँग्रेसकडून एक जागा पक्षाला मिळावी यासाठी काँग्रेस सोबत बोलणी सुरू
वीरेंद्र वर्मा यांनी आज घेतली शरद पवार यांची भेट
बीड-अंबाजोगाई-लातूर महामार्गावर अपघाताची (Accident) मालिका सुरूच
एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात
लग्नाचा बस्ता बांधून निघालेल्या नवरदेवासह बहीण आणि भाची असे तिघे जण जागीच ठार
अवघ्या महिनाभरात होते लग्न; बीडच्या अंबासाखर कारखाना जवळ झाला अपघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत पोहोचले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात हजेरी लावणार
गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाई समस्या ही अधिकच गंभीर बनत चालली आहे. मार्च महिना संपला असल्याने आतापासूनच पाण्याची भीषण टंचाई नागरिकांना भासू लागली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील टँकरची संख्या आता सुमारे 700 च्या वर पोहोचली असून अनेक ठिकाणी तलाव आणि विहिरी कोरड्या टाक असल्याचे चित्र आहे. परिणामी या पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला बसत असून जिल्ह्यात जवळपास अडीचशे पेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठा सद्यस्थितीला केला जातोय.
अमरावतीच्या बिजीलॅड सेंटरमधील साईनाथ मार्केटिंग येथे मध्यरात्री भीषण आग
विदर्भातील सर्वात मोठे कापड मार्केटमधील साईनाथ मार्केटमध्ये आग लागल्याने लाखोंचं नुकसान
शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने 2 तासानंतर आग आटोक्यात
रमेश बारसकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून हकालपट्टी
वंचितकडून माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच करण्यात आलं बडतर्फ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर बारसकर यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा घेतला होता निर्णय
ओबीसी नेते छगन भुजबळ आणि ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बारसकर यांचा संपर्क वाढल्याचा पक्षाकडून करण्यात आलां आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस पदी रमेश बारसकर होते कार्यरत
भिवंडी -वाडा-मनोर मार्गावर डाकीवळीजवळ बर्निग ट्रकचा थरार
मध्यरात्रीच्या सुमारास धावत्या ट्रकला भीषण आग, आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक
गव्हाने भरलेला ट्रक जात असताना महामार्गावरील डाकीवळीजवळ चालत्या ट्रकने अचानक पेट घेतला
ट्रकमध्ये लाखो रुपयांचे गहू होते
शॉर्ट सर्किट ने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव नंदकिशोर कूयटे यांचा सचिव पदाचा व काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा
लोकसभा निवडणुकीत एकाही भोई समाजाला उमेदवारी दिली नाही व विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप
नंदकिशोर कूयटे यांच्या राजीनामाने काँग्रेसच टेन्शन वाढण्याची शक्यता
भोई समाजाला डावललं व लोकसभा निवडणूकीत एकाही भोई समाजाला काँग्रेसने उमेदवार केलं नसल्याने नंदकिशोर कुयटे नाराज
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे नंदकिशोर कुयटे यांनी सोपवला राजीना
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.