Lok Sabha Election : बुलढाणा काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह 25 जणांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Buldhana Constituency : बुलढाणा शहर पोलिसांनी याची दखल घेत आचारसंहिता काळात जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह 25 जणांवर कलम 188 व 135 नुसार गुन्हे दाखल केले आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionSaam tv
Published On

संजय जाधव

Buldhana News :

राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू असतानाच काँग्रेससाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. बुलढाण्यात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दाखल झालाय. जिल्हाध्यक्षांसह अन्य 25 जणांवर देखील गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहितेत आंदोलन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Lok Sabha Election
Buldhana Lok Sabha Election 2024 : बुलढाणा मतदारसंघात महा लोकशाही विकास आघाडीचा उमेदवार जाहीर

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बँक खाते गोठवून त्यामधील रक्कम वळती करण्यात आली. सोबतच काँग्रेस पक्षाला 1800 कोटी रुपयांपेक्षाचा दंड आकारण्यात आला याचा निषेध करण्यासाठी काल बुलढाण्यात जयस्तंभ चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली होती.

त्यामुळे बुलढाणा शहर पोलिसांनी याची दखल घेत आचारसंहिता काळात जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह 25 जणांवर कलम 188 व 135 नुसार गुन्हे दाखल केले आहे. यामुळे जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून २९ मार्च रोजी नवीन नोटीस बजावण्यात आली आहे. साल २०१७-२०१८ आणि २०२०-२०२१ या कालावधीतील दंड तसेच त्यावरील व्याज या संदर्भात ही नोटीस बजावण्यात आलीये. आयकर विभागाने काँग्रेसला १८०० कोटी रूपये रक्कमेचा दंड ठोठावला आहे. आयकर विभागाच्या नोटीसमुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.

Lok Sabha Election
Kalyan Crime: गाडी विकायला अन् जाळ्यात अडकला.. सराईत बाईक चोर गजाआड; चार दुचाकी जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com