Kalyan Crime
Kalyan CrimeSaam Tv

Kalyan Crime: गाडी विकायला अन् जाळ्यात अडकला.. सराईत बाईक चोर गजाआड; चार दुचाकी जप्त

Crime News: पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने खडकपाडा, वालीव, कोपरखैरणे पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुचक्यांच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली.
Published on

अभिजीत देशमुख, कल्याण|ता. ३१ मार्च २०२४

Kalyan Crime News:

रस्त्याच्या कडेला, सोसायटीच्या आवारात, नाक्यावर पार्क केलेल्या बाईक चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण क्राईम ब्रँचने सापळा रचत बेड्या ठोकल्या आहेत. रमजान शेख असे या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून आत्तापर्यंत चार दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बाईक चोरीच्या घटना घडत होत्या. कल्याण क्राईम बँचचे पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. अशातच एक तरुण चोरीची दुचाकी घेऊन 90 फुटी रोड परिसरात येणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचचे मिथुन राठोड आणि विरेंद्र नवसारे यांना मिळाली होती.

ही माहिती दिल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संदिप चव्हाण, विश्वास माने, दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, अनुप कामत, सचिन वानखेडे, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड आणि विजेंद्र नवसारे यांच्या पथकाने पत्रीपुलाजवळ सापळा रचत रमजान शेख या बेड्या ठोकल्या.

Kalyan Crime
chhatrapati sambhaji nagar : ...तर 'वंचित'कडून निवडणूक लढणार; हर्षवर्धन जाधव स्पष्ट बोलले

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने खडकपाडा, वालीव, कोपरखैरणे पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुचक्यांच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतून 8 गुन्हे नोंद असलेल्या रमजानकडून 4 दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. (Crime News in Marathi)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Crime
Water Shortage : संभाजीनगरात पाण्यासाठी महिला आक्रमक; मुख्य टाकीच्या गेटला ठोकले टाळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com