Water Shortage : संभाजीनगरात पाण्यासाठी महिला आक्रमक; मुख्य टाकीच्या गेटला ठोकले टाळे

Sambhajinagar News : गेल्या काही दिवसापासून संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी अनेक वेळा फुटल्याने त्यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली होती. तेव्हा सुद्धा शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने वेळापत्रक कोलमडले होते.
Sambhajinagar Water Shortage
Sambhajinagar Water ShortageSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर परिसरात गेल्या ७ ते ८ दिवसापासून पाणी (Sambhajinagar) आले नसल्याने या परिसरातील महिला चांगल्याच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. संतप्त झालेल्या महिलांनी पाण्याच्या टाकीवर मोर्चा काढत मुख्य घेतलाच कुलूप ठोकले आहे.  (Breaking Marathi News)

Sambhajinagar Water Shortage
Navapur Toll Plaza : नाक्यावर टॅक्स बुडवून तीन टँकर चोर मार्गाने मार्गस्थ; नवापूर पोलिसांनी पकडले ओव्हरलोड टँकर

गेल्या काही दिवसापासून संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी अनेक वेळा फुटल्याने त्यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली होती. तेव्हा सुद्धा शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने वेळापत्रक कोलमडले होते. (Water crisis) त्यावेळी सुद्धा महिलांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन शोले स्टाईल आंदोलन केलं होतं. मात्र आज पुन्हा एकदा पाण्यासाठीच महिलांना आंदोलन करावं लागत आहे. तर दुसरीकडे मागील काही दिवसापासून शहरातील अनेक परिसर आणि वसाहतीमध्ये दहा ते बारा दिवस पाणीपुरवठा (Water Supply) होत नसल्याचे निदर्शनास आलं होतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sambhajinagar Water Shortage
Crop Insurance : धाराशिव जिल्ह्यातील ५४ हजार ७२७ शेतकऱ्यांच्या बँकेत पीकविमा अनुदान

पाणी सोडणारा नशेत 

शहरातील महिलांनी पाण्याच्या टाकी परिसरातील कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी पाणी सोडणारा कर्मचारी हा मध्यधुंद अवस्थेत असल्याचं पहायला मिळाले. शिवाय त्याने महिलांशी अरेरावीची भाषा केल्याचे सुद्धा समोर आले आहे. त्यानंतर या महिलांनी टाकीच्या मुख्य गेटला टाळे ठोकुन महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com